शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धावत्या रेल्वेतून कुटुंबाने मारली उडी, गर्भवती महिलेसह चिमुकली जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:10 IST

औरंगाबाद : अमृतसरकडे जाणाºया सचखंड एक्स्प्रेसमध्ये चुकून बसल्याचे लक्षात येताच पती-पत्नीने चिमुकलीसह धावत्या रेल्वेतून उडी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अमृतसरकडे जाणाºया सचखंड एक्स्प्रेसमध्ये चुकून बसल्याचे लक्षात येताच पती-पत्नीने चिमुकलीसह धावत्या रेल्वेतून उडी मारली. या घटनेत गर्भवती महिलेसह दोन वर्षांची चिमुकली जखमी झाली. लोहमार्ग पोलिसांनी शासकीय रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने घाटीत दाखल केले. ही धक्कादायक घटना औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर शनिवारी (दि. २९) दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास घडली.कविता महेश भंडारवाल (२३) आणि पूनम भंडारवाल (२ वर्षे) असे जखमी माय-लेकीचे नाव आहे. याविषयी माहिती अशी की, कासोदा येथील महेश भंडारवाल हे कुटुंबासह नांदेड येथे जाण्यासाठी शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर आले. नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस येत असल्याची घोषणा होताच अमृतसरकडे जाण्यासाठी प्रवासी संबंधित प्लॅटफॉर्मवर जाऊन उभे राहिले.महेश, कविता चिमुकल्या पूनमसह त्याच प्लॅटफॉर्मवर गेले. रेल्वे येताच अन्य प्रवाशांसोबत भंडारवाल दाम्पत्यही गाडीत बसले. पुढील प्रवासासाठी गाडी निघाली तेव्हा आपण चुकीच्या गाडीत बसल्याचे या दाम्पत्याच्या लक्षात आले. त्यांच्याकडील दोन्ही पिशव्या हातात घेऊन महेशने रेल्वेतून उडी मारली.गाडीचा वेग हळूहळू वाढत असल्याचे पाहून कविताने पूनमला घेऊन पटकन रेल्वेतून उडी मारावी यासाठी महेश रेल्वेसोबत पळत होता. तो सारखा तिला आवाज देऊन उडी मारण्याचे सांगत होता.कविताने पूनमला एका हाताने घट्ट आवळून धावत्या रेल्वेतून उडी मारली. एखाद्या सिनेमाला लाजवील अशा थरारक घटनेत पूनमसह सात महिन्यांची गर्भवती असलेल्या कविताने रेल्वेतून उडी घेतली. त्यात दोघींच्या डोक्याला मार लागला.महेशसह अन्य लोकांनी आरडाओरड केल्याने रेल्वे प्रवासी सेनेचे संतोष सोमाणी आणि लोहमार्ग ठाण्याचे निरीक्षक भगवान कांबळे, उपनिरीक्षक युगंधरा केंद्रे, पोलीस कर्मचारी धनराज गडलिंगे, हरिभाऊ स्वप्ने, श्वेता दमके, शिवसेना कार्यकर्ते ईश्वर रेड्डी यांनी धावपळ करीत रुग्णवाहिकेतून या कुटुंबाला तात्काळ घाटीत दाखल केले.या घटनेची नोंद लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली.