लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात शहरासह जिल्ह्यात श्रींना भाविकांनी मंगळवारी निरोप दिला. जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होतो. यंदा ढोल पथकांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.बारा दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात भक्तिमय वातावरण बाप्पाने मुक्काम केला. यानिमित्त शहरात विविध गणेश मंडळांनी तयार केलेले देखावे पाहण्यासाठी जालनेकरांची गर्दी झाली होती. यंदा डीजे वाजविण्यास बंदी घालण्यात आल्याने ढोल पथकांनी आपली कला सादर करुन भाविकांना मंत्रमुग्ध केले.यंदा घाणेवाडी जलाशयात श्रींचे विसर्जन करु नये, असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर मोती तलावात श्रींचे विसर्जन करणाºयांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून आले.
शहरात बाप्पाला भक्तिभावाने निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:05 IST