शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

श्री विसर्जनासाठी भाविकांना तलावावर जाता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 19:50 IST

तलावात  विसर्जन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याचा पोलिसांचा इशारा

ठळक मुद्देगणेशमूर्तींचे पोलीस आणि एनजीओ करतील विसर्जनतलाव परिसरात लागू राहील कलम १४४

औरंगाबाद : भरपूर पाऊस झाल्याने पाण्याने तुडुंब भरलेल्या  हर्सूल तलावासह शहरालगतच्या अन्य तलावांत  गणेशमूर्तीचे विसर्जन करता येणार नाही.  तलाव परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. यामुळे तलावात  विसर्जन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी दिला.

पोलीस आयुक्त म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवाला सुरुवात झाली. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी यावर्षी श्री विसर्जन मिरवणूक काढण्यास परवानगी नाही. असे असले तरी विसर्जनाच्या दिवशी शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असेल. गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी विसर्जन विहिरींवर गर्दी करू नये, याकरिता कॉलनीतील गणेश मंडळाच्या वाहनातून प्रत्येक घरातील मूर्ती संकलित केल्या जातील. जेथे मंडळ नाही अशा ठिकाणी पोलीस आणि महापालिकेच्या सजवलेल्या वाहनामधून सर्व मूर्ती जमा करून त्या मूर्तींचे विहिरीत विधिवत विसर्जन केले जाणार आहे. या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी केले. 

तलाव परिसरात लागू राहील कलम १४४भरपूर पाऊस पडल्याने हर्सूलसह मिटमिटा, पडेगाव, वाल्मी आणि देवळाई येथील तलाव पाण्याने तुडुंब भरले आहेत. गणपती विसर्जन करताना दुर्घटना होण्याचा धोका लक्षात घेता तलावात गणेशमूर्ती विसर्जनास परवानगी नाही. एवढेच नव्हे तर तलाव परिसरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. यामुळे तलावात मूर्ती विसर्जनाचा प्रयत्न करणाºया व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात येईल. 

कायगाव टोका येथे जाण्यास मनाई : शहरातील हजारो भाविक दरवर्षी श्री विसर्जनासाठी वाहनाने कायगाव टोका येथे जातात. यावर्षी कोरोनामुळे गणेशभक्तांना कायगाव टोका येथे जाण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त : विसर्जन मिरवणूक नसली तरी शहरात नेहमीसारखा तगडा पोलीस बंदोबस्त असेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. शहर पोलिसांच्या मदतीला रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स आणि राज्य राखीव दलाची प्रत्येकी एक कंपनी आणि ३५० होमगार्ड तैनात असतील. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवAurangabadऔरंगाबाद