शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

५०० वर्ष जुनी मूर्ती, निद्रिस्त गणेशाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ; कुठे आहे? कसे जाणार?

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 27, 2023 17:13 IST

भद्रा मारुतीसारखा चक्क झोपलेला गणपती; भाविकांचा मोठ्याप्रमाणात ओढा

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथे झोपलेल्या अवस्थेतील भद्रा मारुतीची मूर्ती सर्वांनाच ठाऊक आहे, अगदी तशीच गणपतीची मूर्तीसुद्धा छत्रपती संभाजीनगरापासून अवघ्या ८२ किमी अंतरावरील आव्हाणे (पैठणजवळ) येथील मंदिरामध्ये आहे. आता तुम्ही म्हणाल, ‘हे काय नवीन’? येथील निद्रिस्त गणपतीची मूर्ती सुमारे ५०० वर्षे जुनी असल्याचे बोलले जाते. अलीकडेच या मंदिराचा जीर्णाेद्धार करण्यात आला आहे.

पैठणपासून ३० किमी तर शेवगावपासून अवघ्या १३ किमी अंतरावर आव्हाणे (बुद्रुक) नावाचे खेडे आहे. या शांत व निसर्गरम्य वातावरणात निद्रिस्त अवस्थेतील गणेशाची दक्षिणमुखी मूर्ती आहे. मंदिरात जमिनीपासून तीन फूट खोल असलेली आणि तीन बाय अडीच फुटांची व शेंदरी रंगातील गणरायाची मूर्ती दिसते. मूर्तीच्या वरच्या बाजूस काचेचे तावदान आहे. मूर्ती दिसण्यासाठी आता छोटासा लाइटही बसविण्यात आला आहे.

येथील पुजारी प्रदीप भालेराव यांनी सांगितले की, दादोबा देव हे गणेशभक्त होते. दरवर्षी ते मोरेगावच्या मोरेश्वराच्या दर्शनाला पायी जात. त्यांच्या निधनानंतर त्यांचा पुत्र गणोबा देव हे शेतात नांगरणी करताना नांगराचा फाळ एका वस्तूला अडला. उकरल्यावर एक स्वयंभू गणेशाची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती दिसली. ही घटना ५०० वर्षे जुनी आहे. त्याच ठिकाणी मंदिर उभारण्यात आले आहे.

१९ वर्षांपूर्वीच शासनाच्या तीर्थक्षेत्र यादीत समावेशराज्य सरकारने २००५ मध्ये या मंदिराचा समावेश तीर्थक्षेत्राच्या यादीत केला. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी तेव्हा ४४ लाख रुपये शासनाने दिले होते. त्यातून गावकऱ्यांनी मिळून चिरेबंदी भव्य मंदिर उभारले आहे.

एकाच गाभाऱ्यात गणेशाची तीन वेगवेगळी रूपेया मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच गाभाऱ्यात गणेशाची तीन वेगवेगळी रूपे बघण्यास मिळतात. निद्रिस्त गणपती, त्या पाठीमागील बाजूस मोरेश्वराची मूर्ती व बाजूलाही शेंदूरवर्णीय गणपतीची मूर्ती अशा तीन मूर्तींचे दर्शन एकाच ठिकाणी होते.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवAurangabadऔरंगाबाद