श्रीकांत पोफळे ।लोकमत न्यूज नेटवर्कशेंद्रा : जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोलीस व प्रशासनाचे कुणीच अधिकारी नसल्याने देवस्थान समितीने माघार घेऊन भक्तांना गळ पुरविले. भक्तांनी ‘गळ खेळून’ नवस फेडले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गळटोचणीचा सिलसिला दिवसभर निर्वेध सुरू होता.शेंद्रा येथील मांगीरबाबा यात्रेस बुधवारी प्रारंभ झाला. प्रशासनाच्या बंदीनंतरही यंदाही यात्रेच्या चित्रात व स्वरूपात काहीही बदल नव्हता. हातात बकरू व काखेत लेकरू घेऊन गळ टोचून नवस फेडणाºया भाविकांची यात्रेत रांग लागलीहोती.
यात्रेत ‘गळ खेळून’ भक्तांनी फेडले नवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:29 IST
जिल्हा प्रशासनाने मांगीरबाबा यात्रेत केलेल्या गळटोचणी बंदीचा पहिल्याच दिवशी फज्जा उडाला. पोलिसांच्या आदेशानुसार देवस्थान समितीने गळ पुरविण्यास असमर्थता दाखविताच भक्त व मंदिर विश्वस्तांमध्ये बुधवारी सकाळी ९ वाजता कडाक्याचे भांडण झाले. यावेळी तेथे पोलीस व प्रशासनाचे कुणीच अधिकारी नसल्याने देवस्थान समितीने माघार घेऊन भक्तांना गळ पुरविले. भक्तांनी ‘गळ खेळून’ नवस फेडले. त्यानंतर उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांसमोर गळटोचणीचा सिलसिला दिवसभर निर्वेध सुरू होता.
यात्रेत ‘गळ खेळून’ भक्तांनी फेडले नवस
ठळक मुद्देशेंद्रा कमंगर : संतप्त भाविकांसमोर मंदिर विश्वस्तांची सपशेल माघार; पोलीस व प्रशासनातील अधिकारी गैरहजर