शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

तोतया निरीक्षक अटकेत

By admin | Updated: July 24, 2016 00:56 IST

औरंगाबाद : दुकानदार, हातगाडीचालकांना दमदाटी करून व्यवसाय करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या महानगरपालिकेच्या तोतया इमारत निरीक्षकाला नागरिकांनी पकडून जवाहरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले

औरंगाबाद : दुकानदार, हातगाडीचालकांना दमदाटी करून व्यवसाय करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या महानगरपालिकेच्या तोतया इमारत निरीक्षकाला नागरिकांनी पकडून जवाहरनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही घटना शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास शिवाजीनगर रेल्वेपटरीजवळ घडली. ईश्वर हिरामण सातदिवे (४५, रा. रेणुकानगर, गारखेडा, मूळ रा. चिंचोली, ता. खुलताबाद) असे तोतया इमारत निरीक्षकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शिवाजीनगरमधील बी. सेक्टर येथे राहणारे गजानन बसैये हे शिवाजीनगर रेल्वेपटरीजवळ वडापाव विक्रीची हातगाडी लावून व्यवसाय करतात. शनिवारी दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास गजानन बसयै हे नेहमीप्रमाणे आपला व्यवसाय करीत असताना सफारी सूट घातलेला आरोपी त्यांच्या हातगाडीवर आला. यावेळी त्याने स्वत: महानगरपालिकेचा इमारत निरीक्षक असल्याचे त्यांना सांगितले. तुम्ही येथे अनधिकृत हातगाडी लावली आहे. त्यामुळे तुम्हाला एक हजार रुपये दंडाची पावती फाडावी लागेल, असे तो म्हणाला. यावेळी बसैये यांच्याकडून पाचशे रुपये घेतले, मात्र त्यांना पावती दिली नाही. त्यानंतर तो हातगाडीशेजारील एका गॅरेजवर गेला. या गॅरेजचे मालक आनंदराव देसाई हे दुकानात बसलेले होते. यावेळी मी या एरियाचा इमारत निरीक्षक आहे. तुम्ही काय समजता, मी कोण आहे, तुम्हाला येथे दुकान चालवायचे असेल तर मला रोख दोन हजार रुपये द्यावे लागतील, असे धमकावण्याच्या स्वरात तो देसाई यांना म्हणाला. यावेळी देसाई यांच्या शेजारील अन्य दुकानदारांना त्याच्याबद्दल संशय आला, त्यामुळे त्यांनी तात्काळ या भागाचे नगरसेवक यांच्या कार्यालयात फोन करून तेथे काम करणाऱ्या अमोल पाटे यांना बोलावून घेतले. गॅरेजचालकांसह दुकानदारांकडून पैसे उकळणारा इमारत निरीक्षक खरा आहे अथवा तोतया याबाबत खात्री करण्यास सांगितले. तेव्हा उपस्थितांनी आरोपीचे छायाचित्र मोबाईलमध्ये घेऊन महानगरपालिका कार्यालयात बसलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर पाठवून दिले. पदाधिकाऱ्यांनी याबाबत पडताळणी केल्यानंतर हा इमारत निरीक्षक तोतया असल्याचे स्पष्ट झाले. त्यावेळी लोकांनी त्यास पकडून ठेवले आणि जवाहरनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनीष कल्याणकर यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने स्वत:चे नाव ईश्वर सातदिवे असल्याचे सांगितले. याप्रकरणी बसैये यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.आरोपी सातदिवे याने चार महिन्यांपूर्वी खाजगी सुरक्षारक्षकाची नोकरी सोडली. तीन दिवसांपासून तो अधिकारी, कर्मचाऱ्यांना न कळू देता पथकासोबत फिरत होता. कर्मचारी रस्त्यांवरील अतिक्रमण काढताना काय बोलतात, त्यांच्याशी कसे वागतात, याचा त्याने जवळून अभ्यास केला. ४त्यानंतर त्याच्या डोक्यात ही फसवणुकीची कल्पना आली. त्यानंतर त्याने इमारत निरीक्षक असल्याची बतावणी करून पैसे उकळण्यास सुरुवात केली. अखेर तो पकडल्या गेला.