शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार’ असतानाही परीक्षेपासून केले निराधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 01:16 IST

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अभियंतापदासाठी आयोजित पूर्व परीक्षेत परीक्षार्र्थींकडे आधार कार्डसह इतर पुरावे असतानाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही, असा आरोप परीक्षार्र्थींनी केला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अभियंतापदासाठी आयोजित पूर्व परीक्षेत परीक्षार्र्थींकडेआधार कार्डसह इतर पुरावे असतानाही परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात आला नाही, असा आरोप परीक्षार्र्थींनी केला. परीक्षार्र्थींकडे आधारसह बँक पासबुक, महाविद्यालयाचे ओळखपत्र असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र परीक्षेचे नियोजन करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रवेशासाठी आयोगाचे निर्देश काटेकोरपणे पाळण्यात आल्याचे स्पष्ट केले.एमपीएससीतर्फे महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन शहरातील १४ केंद्रांवर केले होते. परीक्षेसाठी विद्यार्थी केंद्रांवर हजर झाले असता, त्यांना दोन ओळखपत्रांची मागणी करण्यात येत होती. मात्र अनेकांनी केवळ आधार हेच ओळखपत्र म्हणून सोबत आणले होते. तसेच काही विद्यार्थ्यांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र, बँक पासबुकची झेरॉक्स होती. या ओळखपत्रांवर विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याचा फटका १४ केंद्रांवरील ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना बसला असल्याची माहिती परीक्षार्थी सचिन राठोड याने ‘लोकमत’शी बोलताना दिली. या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकीच्या परीक्षेची तयारी दोन ते तीन वर्षांपासून केलेली असताना त्यांना ऐनवेळी दोन ओळखपत्र मागितल्यामुळे परीक्षेपासून वंचित राहावे लागले. या परीक्षेसाठी ४ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र दाखल केले होते. यातील परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही ३ हजार २३१ एवढी आहे. तर अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या १,२७५ आहे. एकूण परीक्षार्र्थींपैकी ७१.७० टक्के विद्यार्थ्यांनीच परीक्षा दिल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मागील तीन परीक्षांपासून परीक्षार्र्थींना दोन ओळखपत्रे दाखविल्याशिवाय परीक्षा केंद्रांत प्रवेश न देण्याचा नियम केला आहे. आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकीच दोन ओळखपत्र असणे आवश्यक आहे. दोन ओळखपत्र असणाºया विद्यार्थ्यांना कोठेही अडविण्यात आलेले नाही. मात्र ज्यांच्याकडे एकच ओळखपत्र होते, त्यांना परीक्षा केंद्रांत प्रवेश देण्यात आलेला नाही.- रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी, सामान्य प्रशासन

 

टॅग्स :examपरीक्षाAdhar Cardआधार कार्ड