शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठांमधील पदनाम घोटाळा : अनियमितता करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे शासनाने आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 19:12 IST

वित्त विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अनियमितता करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.

ठळक मुद्देपदनामे व वेतनश्रेणी कटाक्षाने पूर्ववत करा

औरंगाबाद : राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये शेकडो कर्मचाऱ्यांना अनियमितपणे पदनाम बदलून वेतनश्रेण्या बदलण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यासंदर्भात बक्षी समितीने सातव्या वेतन आयोगाच्या अहवालात केलेल्या शिफारशी वित्त विभागाने मान्य केल्या आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वित्त विभागाने काढलेल्या शासन निर्णयात अनियमितता करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश काढले आहेत.

राज्य शासनाने सातव्या वेतन आयोगासाठी राज्य वेतन सुधारणा समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांनी शासनाला सादर केलेल्या अहवालात विद्यापीठांमध्ये पदनाम बदलून शेकडो कर्मचाऱ्यांना ७ आॅक्टोबर २००९ च्या अधिसूचनेपेक्षा अधिकची वेतनश्रेणी उच्च शिक्षण विभागाने मंजूर केली आहे. या बदललेल्या वेतनश्रेण्यांना वित्त विभागाची मंजुरी मिळालेली नसल्याचे स्पष्ट केले होते.

यानुसार पदनाम, वेतनश्रेण्या पूर्ववत करून अतिप्रदान वसुली कटाक्षाने करण्याची शिफारस केली. हा अहवाल शासनाने स्वीकारल्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  तातडीने कार्यवाही करीत सहा विद्यापीठांतील कर्मचाऱ्यांच्या बदललेल्या वेतनश्रेण्यासंबंधी आठ शासन निर्णय रद्द करणारा शासन निर्णय १७ डिसेंबर २०१८ रोजी निर्गमित केला. यानंतर राज्य मंत्रिमंडळाने बक्षी समितीच्या शिफारशी स्वीकारत सातवा वेतन आयोग १ जानेवारीपासून देण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली.वित्त विभागाने १ जानेवारी रोजी शासन निर्णय काढत बक्षी समितीच्या स्वीकारलेल्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू केली आहे. यानुसार विद्यापीठांमधील पदनाम बदलाच्या अनियमिततेला जबाबदार असणाऱ्या उच्च शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर त्वरित शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचा शासनादेश मंगळवारी काढला आहे.

बक्षी समितीची दिशाभूल केलीविद्यापीठीय संघटनांनी सादर केलेले वेतन त्रुटीचे प्रस्ताव हे दिनांक ७ आॅक्टोबर २००९ च्या अधिसूचनेतील पदानुसार असून, पाच विद्यापीठांच्या बदललेल्या पदनामाप्रमाणे नाही. त्यामुळे अनेक वेतन पदाची त्रुटी आजही कायम आहे. ती दूर करण्याची गरज असताना उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पदनाम बदललेल्या विद्यापीठांच्या पदांचे संदर्भ देऊन बक्षी समितीची दिशाभूल केली आहे. त्यामुळे समितीच्या अहवालात संपूर्ण चुकीची व विसंगत माहिती नमूद झाली आहे. याबाबत बक्षी समितीला वस्तुस्थिती निदर्शनास आणून देण्याचे ठरविले आहे. - रमेश शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघ

टॅग्स :fraudधोकेबाजीuniversityविद्यापीठState Governmentराज्य सरकार