शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

देशमुखांनी राखला जिल्हा बँकेचा गड

By admin | Updated: May 8, 2015 00:28 IST

चेतन धनुरे , लातूर बँकेच्या स्थापनेपासून वर्चस्व टिकवून असलेल्या काँग्रेसने यावेळी जिल्हा बँकेचा गड आपल्या ताब्यात राखला आहे़ १९ पैकी १७ जागा आरामात पटकावीत देशमुख गटाने

चेतन धनुरे , लातूरबँकेच्या स्थापनेपासून वर्चस्व टिकवून असलेल्या काँग्रेसने यावेळी जिल्हा बँकेचा गड आपल्या ताब्यात राखला आहे़ १९ पैकी १७ जागा आरामात पटकावीत देशमुख गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले़ परंतु, पतसंस्था गटातून व जळकोट येथून हे वर्चस्व मोडून काढत प्रथमच भाजपाचे रमेश कराड व अपक्ष धर्मपाल देवशेट्टे यांनी बँकेत प्रवेश केला़ या रणधुमाळीत अशोक गोविंदपूरकर व शीलाताई पाटील या दिग्गजांना मात्र धक्का बसला़सहकार क्षेत्रावर असलेली काँग्रेसची पकड जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली़ जवळपास ८ वर्षांनंतर लागलेल्या निवडणुकीत यावेळी काँग्रेसने विलासराव देशमुख विकास पॅनलच्या माध्यमातून चढाईची तयारी केली होती़ संचालक मंडळ बिनविरोध काढण्यासाठी यावेळीही प्रयत्न झाले़ परंतु, सहकार क्षेत्रात आपले पाय रोवू इच्छिणाऱ्या भाजपाने काही ठिकाणी आपले उमेदवार कायम ठेवले़ दरम्यान, १९ पैकी विलासराव देशमुख पॅनलचे १३ उमेदवार निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत़ मात्र जळकोट, देवणी, शिरुर अनंतपाळ, अहमदपूर, चाकूर येथील सोसायटी गटात व पतसंस्था गटात देशमुख गटाला आव्हान देत विरोधकांनी लढत दिली़ त्यापैकी माजी आमदार बाबासाहेब पाटील यांनी एकतर्फी विजय मिळविताना पडलेल्या ६९ पैकी ४६ मते मिळविली आहेत़ शिरुर अनंतपाळ येथून विजयी झालेल्या व्यंकटराव पाटील यांनीही शेवटच्या क्षणाला विरोधी लक्ष्मण बोधले यांचा पाठिंबा मिळवून सर्वच २६ मते पदरी पाडून घेतली़ देवणीतून भगवान पाटील विजयनगरकर यांनी भगवान पाटील तळेगावकर यांच्यावर ५ मतांनी मात करतानाच सलग दुसऱ्यांदा बँकेत प्रवेश केला़ चाकूरमधून नागनाथ पाटील यांनीही २५ मते मिळवीत विजयश्री मिळविली़ दरम्यान, वर्चस्वाला शह देण्यासाठी नेटाने उभे राहिलेले भाजपाचे रमेशप्पा कराड यांनी यावेळी तब्बल २५ ने मताधिक्य मिळवून प्रतिस्पर्धी दिग्गज अशोक गोविंदपूरकर यांचा पराभव केला़ जळकोटमध्ये धक्कादायक निकाल देताना अपक्ष धर्मपाल देवशेट्टे यांनी शीलाताई पाटील यांच्यावर ४ मतांनी मात केली़प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच धान्य अधिकोष सहकारी संस्था मतदारसंघातून अहमदपूर-बाळासाहेब पाटील यांनी ४६ मते घेऊन विजय प्राप्त केला. आबासाहेब देशमुख यांना २३ मते पडली. चाकूर- नागनाथ पाटील यांनी २५ मते घेऊन विजय मिळविला. प्रदीप जाधव यांना १ मत, शिवाजी काळे यांना १५ मते मिळाली. जळकोट- धर्मपाल देवशेट्टे यांनी १९ मते मिळवून विजय प्राप्त केला. शिलाताई पाटील यांना १५ मते मिळाली. शिरूर अनंतपाळ- व्यंकट बिरादार २६ मते घेऊन विजयी झाले. लक्ष्मण बोधले यांना शून्य मते मिळाली. देवणी- भगवानराव वामनराव पाटील यांनी १८ मते घेऊन विजय प्राप्त केला. भगवानराव रामचंद्र पाटील यांना १३ मते मिळाली. तर नागरी सहकारी बँका, नागरी सहकारी पतसंस्था, ग्रामीण बिगर शेती पतसंस्था, पगारदार नोकर सहकारी संस्था या मतदारसंघातून रमेश कराड यांनी ११४ मते मिळवून विजय प्राप्त केला. तर अशोक गोविंदपूरकर यांना ८९ मते मिळाली. ११२ शाखांच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांशी नाळ जोडलेल्या जिल्हा बँकेने सहकारात आपले मजबूत पाय रोवले आहेत़ १६ आॅगस्ट १९८२ रोजी लातूर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर २१ जुलै १९८४ रोजी उस्मानाबाद जिल्हा बँकेचे विभाजन होवून स्वतंत्र लातूर जिल्हा बँकेची घोषणा झाली़ त्यानंतर लगेचच १५ आॅगस्ट १९८४ रोजी बँक अस्तित्वास आली़ २९ जानेवारी १९८७ रोजी बँकेवर पहिले लोकनियुक्त संचालक मंडळ आले़ बँकेचे पहिले चेअरमन म्हणून सहकाराला शिस्त लावणाऱ्या माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी काम पाहिले़ त्यानंतरच्या काळात नामदेवराव पाटील, रामचंद्रराव पाटील, श्रीपतीराव काकडे, बाबासाहेब पाटील, शीलाताई पाटील, सुभाष काळदाते, यशवंतराव पाटील, सूर्याजीराव शिंदे, विजयकुमार पाटील, एस़आऱ देशमुख यांनी चेअरमन म्हणून काम पाहिले आहे़ यात दोनवेळा बँकेच्या चेअरमन म्हणून एकमेव शीलाताई पाटील यांची वर्णी लागली़ तर दीर्घकाळ चेअरमन पद एस़आऱ देशमुख यांनी भूषविले आहे़प्रारंभीपासूनच वर्चस्व राखून असलेल्या देशमुख गटाला यावेळी जळकोट सोसायटी व पतसंस्था गटातून धक्का बसला़ दोन वेळा बँकेच्या चेअरमन राहिलेल्या शीलाताई पाटील यांच्या पदरी यावेळी जळकोट सोसायटी गटातून पराभव पडला़ त्यांना अपक्ष धर्मपाल देशवशेट्टे यांनी ४ मतांनी हरविले़ तसेच पतसंस्था गटातून मागच्या वेळी दोघांना समान मते पडली होती. मात्र त्यावेळी नशिबाचा कौल विरोधात गेल्याने भाजपाच्या रमेशप्पा कराड यांनी यावेळी जोर लावल्याने त्यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली़ अत्यंत अभ्यासू असलेले अशोक गोविंदपूरकर यांना कराड यांच्याकडून यावेळी २५ मतांनी पराभूत व्हावे लागले़देशमुखांच्या बालेकिल्ल्यात सातत्याने धडका देणाऱ्या रमेशप्पा कराड यांच्यावर यावेळी विजयाचा गुलाल पडला़ रमेशप्पा कराड यांनी २००९ व २०१४ मध्ये लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा नशीब आजमावले़ परंतु, दोन्ही वेळा त्यांना पराभवाचे तोंड पहावे लागले होते़ दरम्यान, देवणी गटातून निवडणूक लढविलेल्या भगवान पाटील यांच्या नशिबी मात्र राजयोग नव्हता़ ४याआधी त्यांनी देवणी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढविली होती़ परंतु, तेथे त्यांना पराभव पहावा लागला़ यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती झाली़