शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन शुल्क विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर तडकाफडकी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 22:52 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर यांना बुधवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्या निलंबन आदेशाची गुरुवारी सकाळी अंमलबजावणी करण्यात आली. दरेकर यांची खातेनिहाय चौकशी आदेशित करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले.

औरंगाबाद : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबाद विभागाच्या उपायुक्त संगीता दरेकर यांना बुधवारी रात्री तडकाफडकी निलंबित केले. त्यांच्या निलंबन आदेशाची गुरुवारी सकाळी अंमलबजावणी करण्यात आली. दरेकर यांची खातेनिहाय चौकशी आदेशित करण्यात आल्याचे निलंबनाच्या आदेशात नमूद करण्यात आले. निलंबित केल्याचे कळताच दरेकर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.सूत्रांनी सांगितले की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या औरंगाबादच्या उपायुक्तपदी संगीता दरेकर या दीड वर्षापासून कार्यरत होत्या. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे नियंत्रण त्यांच्या कार्यालयातून होते. दरेकर यांच्या निलंबनाचे आदेश गृहविभागाने बुधवारी सायंकाळी काढले. या आदेशामध्ये दरेकर यांची खातेनिहाय चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत. आदेशानुसार दरेकर यांच्या पदाचा चार्ज पुण्याचे उपायुक्त अर्जुन ओव्हळ यांच्याकडे सोपविण्यात आला. दरेकर यांच्याविरोधात नेमक्या काय तक्रारी शासनाकडे होत्या, हे मात्र समजू शकले नाही. औरंगाबादला रुजू होण्यापूर्वी त्या कोल्हापूर येथे कार्यरत होत्या. उपायुक्त दरेकर यांच्यासोबतच सोलापूर येथील एका जवानालाही निलंबित करण्यात आले. उपायुक्त दरेकर आणि सोलापूर येथील जवान यांच्या निलंबनाचा केवळ संयोग आहे अथवा दोघांच्या निलंबनाचे वेगवेगळे कारण आहे. हे मात्र समजू शकले नाही.उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागात खळबळ उडाली आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी कोण करणार हे मात्र समजू शकले नाही. याविषयी दरेकर यांची प्रतिक्रियाही समजू शकली नाही.

टॅग्स :Excise Departmentउत्पादन शुल्क विभागGovernmentसरकार