शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव घाटचा विश्वास शिरसाठ बनला उपजिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 00:34 IST

ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारता येऊ शकते, हे कन्नड तालुक्यातील जळगाव घाट या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विश्वास शिरसाठ या तरुणाने दाखवून दिले आहे.

चापानेर : ग्रामीण भागात मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेला, कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून थेट उपजिल्हाधिकारी पदापर्यंत मजल मारता येऊ शकते, हे कन्नड तालुक्यातील जळगाव घाट या छोट्याशा गावातील मध्यमवर्गीय कुटुंबातील विश्वास शिरसाठ या तरुणाने दाखवून दिले आहे. राज्यात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन चापानेर पंचक्रोशीतील तो पहिला उपजिल्हाधिकारी बनला आहे. परिसरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.विश्वास शिरसाठ यांचे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. वडील सेवानिवृत्त शिक्षक आहेत. विश्वासचे प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमातील जळगाव घाट या लहान खेडेगावात झाले. दहावीचे शिक्षण कन्नड येथील काकासाहेब देशमुख शाळेत. बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयात तर पदवीचे शिक्षण औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाले. त्यानंतर दोन वर्षे त्यांनी जिंतूर येथे नगरपरिषदेत कनिष्ठ विद्युत अभियंता या पदावर नोकरी केली. मात्र, लहानपणापासून उपजिल्हाधिकारी व्हायचे स्वप्न स्वस्थ बसू देत नसल्याने अखेर त्या नोकरीचा जानेवारी २०१५ मध्ये राजीनामा दिला. नोकरी सोडली त्यावेळी खूप जणांनी नाव ठेवले. मात्र ध्येय न सोडता तीन वर्षे सतत ८ ते १० तास स्वअभ्यासावर भर दिला. त्यांनी राज्यसेवेच्या चार परीक्षा दिल्या, त्यात कमी फरकाच्या गुणामुळे अपयश आले. तरीही जिद्द न सोडता त्यांनी अखेर मेहनतीने जोरावर हे यश संपादन करून लहानपणी पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आवडीचे क्षेत्र निवडून करिअर केले पाहिजे. वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी मला नोकरी सोडली तरीही पाठींबा दिला. या यशाचे श्रेय ते आई- वडील,भाऊ, शिक्षक वर्ग, मित्र परिवार व ग्रामस्थांना देतात. या यशाने मुलाने पांग फेडल्याची भावना त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना इंजिनिअरिंग शिक्षणाचा अधिकाधिक उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करून लोककेंद्रीत कामाला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीexamपरीक्षा