शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दंतोपचाराला हवी विम्याची ‘बळकटी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 18:45 IST

मौखिक स्वच्छता दिन : मौखिक स्वच्छतेला आली आधुनिकतेची ‘चकाकी’

ठळक मुद्दे१० व्यक्तींमागे ८ जणांना हिरड्यांचे आजार असतात. १० व्यक्तींमागे ८ जणांना हिरड्यांचे आजार असतात.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म’ असे आपल्याकडे म्हटले जाते. ज्या मुखाद्वारे अन्नग्रहण केले जाते, निरोगी आयुष्यासाठी त्याचे आरोग्य राखणे महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी मुखाची नियमित आणि योग्य पद्धतीने स्वच्छता होणे गरजेचे आहे. बदलत्या जीवनशैलीत अनेक गोष्टींमध्ये आधुनिकता रुजली आहे. मौखिक स्वच्छतेमध्येही पारंपरिक साधनांबरोबर आता आधुनिक साधनांनी शिरकाव केला आहे. परदेशांप्रमाणे भारतातही दंतोपचाराला विम्याची बळकटी मिळण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले.

भारतात दरवर्षी १ आॅगस्ट रोजी डॉ. जी. बी. शंकवाळकर यांच्या जयंतीनिमित्त मौखिक स्वच्छतेसंदर्भात जनजागृती होण्यासाठी मौखिक स्वच्छता दिन पाळण्यात येतो. मौखिक स्वच्छता म्हणजे दोन हिरड्या, जीभ, टाळू व गालाच्या आतील भाग या सर्व अवयवांची स्वच्छता करणे होय. मौखिक स्वच्छतेअभावी हिरड्यांचे आजार, दंतक्षय, मुख दुर्गंधीला सामोरे जावे लागते.  अन्नग्रहण करताना दातांमध्ये त्याचे कण अडकतात. त्यातून जिवाणूची निर्मिती होते आणि मुख दुर्गंधीसह अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. त्यामुळे दातांची निगा आणि पर्यायाने मुख आरोग्याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

बाभळी, कडुनिंबाची काडी, तसेच राख आणि कोळसा, मिश्रीचा वापर मागे पडून मंजन, टूथपेस्ट, ब्रश आले. आता डेंटल फ्लॉस (नायलॉनचा धागा), माऊथ वॉश, वॉटर जेटस् (दात स्वच्छ करण्याचे उपकरण) यांचा प्रवेश झाला आहे. ग्रामीण भागात टूथपेस्ट आणि ब्रश यांचा वापर करण्याचे प्रमाण आजही कमीच आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. १० व्यक्तींमागे ८ जणांना हिरड्यांचे आजार असतात. परंतु त्याविषयी जनजागृतीचा अभाव दिसतो. वेदना असेल तरच उपचार घेण्यास प्राधान्य दिले जाते. परंतु अनेकदा वेदना नसतात. काहींकडून विम्याची सुरुवात झाली आहे. मुख आरोग्याबरोबर शारीरिक आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे डॉ. सी. डी. ढालकरी यांनी सांगितले 

मुख कर्करोगाचे ४०% रुग्ण माऊथ वॉश डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतरच वापरले पाहिजे. कर्करोगाच्या एकूण रुग्णांमध्ये ४० टक्के रुग्ण हे मुखकर्करोगाचे असतात. सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ केले पाहिजे. समतोल आहार घेतला पाहिजे. नियमित सहा महिन्यांनी डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे.- डॉ. माया इंदूरकर, विभागप्रमुख, दंत परिवेष्टणशास्त्र विभाग, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय

विम्याचे कवच मिळावेदंतोपचारासाठी लागणारी रक्कम ऐकून अनेक जण दंतोपचार घेण्याचे टाळतात. परदेशांमध्ये दातांसाठी विमा आहे. मात्र, भारतात अद्यापही विमा पद्धत रुजलेली नाही. दंतोपचारासाठी विम्याची नितांत गरज आहे. तंबाखू, गुटखा, खर्रा खाणे टाळले पाहिजे. आहारातील बदलाने दातांच्या स्वच्छतेसाठी अनेक बाबी आल्याचे जाणवते.- डॉ. सुषमा सोनी, अध्यक्षा, इंडियन डेंटल असोसिएशन, औरंगाबाद

टॅग्स :Healthआरोग्यAurangabadऔरंगाबादDental Care Tipsदातांची काळजीMedicalवैद्यकीय