शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत डेंग्यूचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 14:05 IST

नियंत्रण चालू असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

ठळक मुद्देजिल्ह्यात डेंग्यूची ५२ रुग्ण आढळले  डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वेगळीच 

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात डेंग्यूमुळे ११ जणांचा मृत्यू झाला असताना आता डेंग्यूचा जिल्ह्यातही फैलाव झाला आहे. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये तब्बल ५२ रुग्णांना डेंग्यू झाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी दिली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला, असे असले तरी अनेक गावांमध्ये मात्र धास्तीचे वातावरण आहे. 

औरंगाबाद शहरासह जिल्हाभरात डेंग्यूची लागण झाली आहे. ग्रामीण भागात लागण झालेल्या डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांसह साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एन. बारडकर यांच्या नेतृत्वात प्रयत्न करण्यात येत आहेत. डेंग्यूसदृश रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागातर्फे रॅपिड टेस्ट कीटद्वारे तपासणी करण्यात येत आहे. यात डेंग्यूची लागण झाली असल्याची शक्यता वाटल्यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील (घाटी) प्रयोगशाळेत ‘एलायझा’ टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. बारडकर यांनी दिली. या टेस्टनुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५२ रुग्णांना डेंग्यू झाला आहे.

यात सर्वाधिक रुग्ण हे सिल्लोड तालुक्यातील आहेत. मात्र, डेग्यूची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा दावाही त्यांनी केली. तलवाडा गावात रुग्णाचा मृत्यू हा डेंग्यूने झालेला नाही. इतर आजार असल्यामुळे उलटी होऊन त्याचा मृत्यू झाल्याचेही दिलेल्या भेटीमध्ये स्पष्ट झाले. औरंगाबाद तालुक्यातील २ रुग्णांना डेंग्यू झाला आहे. तर पैठण तालुक्यात १, खुलताबाद ७, गंगापूर ५, वैजापूर ११, सिल्लोड १९, सोयगाव २, फुलंब्री १ आणि  कन्नड तालुक्यात ४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे.

या उपाययोजना केल्या जाताहेत ग्रामीण भागात तापाचे रुग्ण आढळताच तात्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रात पाठविले जात आहे. याशिवाय गावोगाव ‘ताप रुग्ण सर्वेक्षण’ करण्यास सुरुवात केली आहे.  याशिवाय जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने दिलेल्या भेटीमध्ये अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या विहिरी उघड्या आहेत.४या विहिरीच्या परिसरात अस्वच्छता असून, डास उत्पादन याच ठिकाणी होत असल्याचेही पाहणीत आढळून आल्याचे डॉ. बारडकर यांनी सांगितले. यामुळे गटविकास अधिकारी, पंचायतच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवून ग्रामपंचायतींना डासांची उत्पत्ती होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण मिळवावे, अशा सूचना देण्यास सांगितले आहे.

५० प्राथमिक, तर २६९ उपकेंद्रांमार्फत प्रयत्नडेंग्यूची लागण रोखण्यासाठी जिल्हाभरात असलेल्या ५० प्राथमिक आरोग्य केंदे्र आणि  २६९ उपकेंद्रांच्या माध्यमातून जनतेमध्ये जनजागृती करण्यात येत असल्याची माहितीही डॉ. बारडकर यांनी दिली. प्रत्येक गावात जाऊन आठवड्यातून एक दिवस ‘ड्राय डे’ पाळण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय डेंग्यूची लागण होण्याची प्राथमिक लक्षणे आढळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी संबंधित गावात जाऊन तपासणी करीत असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :dengueडेंग्यूAurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटल