शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

By admin | Updated: December 22, 2015 00:11 IST

औरंगाबाद : महापालिका मुख्यालयाच्या इमारतीपासून केवळ पन्नास फुटांवर असलेल्या नूर कॉलनी या वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराने आतापर्यंत दोन बालकांचा मृत्यू झाला.

औरंगाबाद : महापालिका मुख्यालयाच्या इमारतीपासून केवळ पन्नास फुटांवर असलेल्या नूर कॉलनी या वसाहतीत डेंग्यूसदृश आजाराने आतापर्यंत दोन बालकांचा मृत्यू झाला. परिसरातील विविध घरांमध्ये आजही २५ पेक्षा अधिक रुग्ण अंथरुणाला खिळून आहेत. सोमवारी मध्यरात्री एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने नागरिकांनी महापालिकेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. असंख्य तक्रारी करूनही प्रशासन या वसाहतीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांचा आहे.शहराच्या विविध भागांत आजही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण सापडत आहेत. डेंग्यूचा रुग्ण सापडल्यानंतरही डॉक्टर त्यावर संशयित असाच उल्लेख करीत आहेत. कारण पूर्वी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मनपाला कळवावी लागत असे. तत्कालीन आरोग्य अधिकारी खाजगी डॉक्टरांना डेंग्यू न लिहिता संशयित लिहावे म्हणून दबाव टाकत असत. त्यामुळे आजही शहरातील अनेक खाजगी डॉक्टर संशयित म्हणूनच रुग्णांवर उपचार करीत आहेत. मागील महिन्यात चिकलठाणा येथे एका डेंग्यूसदृश आजाराने चिमुकलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर नूर कॉलनीत दहा वर्षीय मुलगा मरण पावला. सोमवारी समिरोद्दीन फारुकी या १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मागील चार दिवसांपासून त्याला ताप येत होता. खाजगी डॉक्टरांकडे उपचार सुरू होते. काल मध्यरात्री त्याची प्रकृती अधिक बिकट झाली. त्याला त्वरित एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात नेत असतानाच समिरोद्दीनची प्राणज्योत मालवली. डेंग्यूचा ताप डोक्यात गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीय करीत आहेत. कारण मृत्यूपूर्वी समिरोद्दीन डोके प्रचंड दुखत असल्याची तक्रार करीत होता. या घटनेनंतर नूर कॉलनी व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.