शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये ‘डेंग्यू’चे सात दिवसांत सात रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 19:28 IST

डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरियासदृश रुग्णांतही होतेय वाढ

ठळक मुद्देकाही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे.घाटीत सध्या त्याचा तुटवडा आहे.

औरंगाबाद : शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पडलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले आहे. या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत असल्याने डेंग्यू आणि मलेरियासदृश आजारांनी शिरकाव केला आहे. जुलै महिन्याच्या अवघ्या ७ दिवसांत ७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे, तर घाटीत दररोज ५ ते ६ मलेरियासदृश रुग्ण दाखल होत आहेत.

पावसाळ्याला सुरुवात होताच कोरडा दिवस, धूरफवारणीसह विविध उपाय राबविण्यावर भर दिला जातो; परंतु अवघ्या काही दिवसांच्या पावसानंतरच औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात डेंग्यू आणि डेंग्यूसदृश रुग्ण आढळून येत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम, घरांचे सर्वेक्षण करणे, डास नष्ट होण्यासाठी विविध उपाययोजना, कोरडा दिवस, धूरफवारणी यासह शाळा-महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत, तरीही डेंग्यूने डोके वर काढायला सुरुवात केली आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत डेंग्यूचे ७ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये दोन रुग्ण ग्रामीण भागातील, तर पाच रुग्ण हे शहरातील असल्याची माहिती जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे देण्यात आली.

पावसाळ्यात कीटकजन्य आजारांचा संभाव्य उद्रेक टाळण्यासाठी आरोग्य उपसंचालक, तसेच जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या आहेत, तसेच नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, असे आवाहन जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे क रण्यात आले आहे.

‘ओआरएस’चा तुटवडाजलजन्य आजारांच्या रुग्णासाठी ‘ओआरएस’ महत्त्वपूर्ण ठरते; परंतु घाटीत सध्या त्याचा तुटवडा आहे. याविषयी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर म्हणाल्या, साथरोगांच्या दृष्टीने घाटीत औषधी उपलब्ध आहेत. ‘ओआरएस’ची स्थानिक पातळीवर खरेदी केली जात आहे.

नागरिकांनी काळजी घ्यावीपावसाळ्याच्या कालावधीत पाणीसाठ्यात वाढ होत असल्याने डासांमध्ये आणि डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्यासारख्या आजारांत वाढ होत असते. रुग्णांची संख्या नियंत्रणात असली तरी नागरिकांनीदेखील काळजी घेणे आवश्यक आहे. -अनिल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी

औषधींना प्रतिसादघाटीत डायरियाचे दररोज ३ ते ४ रुग्ण दाखल होत आहेत, तर मलेरियासदृश ५ ते ६ रुग्ण येत आहेत. घाटीत पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. रुग्णांना मलेरियाची औषधी दिली जात असून, त्याला प्रतिसाद मिळत असल्याने रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होते. - डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, विभागप्रमुख, मेडिसिन विभाग, घाटी

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdengueडेंग्यूhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर