शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात डेंग्यूचा फैलाव

By admin | Updated: August 7, 2014 02:06 IST

औरंगाबाद : सातारा गावात दोन दिवसांपूर्वी एक डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग जोमाने कामाला लागला आहे.

औरंगाबाद : सातारा गावात दोन दिवसांपूर्वी एक डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग जोमाने कामाला लागला आहे. या परिसरात डेंग्यूने चांगलेच हातपाय पसरले असून अनेक जण तापेने फणफणले आहेत. ४५ घरांत डासांच्या अळ्या तपासणीत आढळून आल्याने खळबळ उडाली. डेंग्यू रुग्ण आढळल्याने सातारा ग्रामपंचायतीने रक्ताचे नमुने, औषध फवारणी, उघडे पाण्याचे ड्रम, हौदात अ‍ॅबेट टाकण्यासाठी २४ कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली आहे.ग्रामपंचायतीच्या पथकांकडे असलेल्या छोट्या फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणीचे काम हाती घेतले असून, मोठी मशीन अद्यापही उपलब्ध झालेली नाही.शहरासह सातारा भागातही डेंग्यूने डोके वर काढले असून, थंडी तापाची कणकण अनेकांत दिसत आहे. पाणी झाकून ठेवा, पाणी उकळून गाळून प्यावे, परिसरात पाण्याची गटारे साचू देऊ नका, असे आवाहन करून आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य व ग्रामपंचायतीचे कर्मचारी झपाटून कामाला लागले आहेत. औषध फवारणीचे ग्रामपंचायतीचे फॉगिंग मशीन पुणे येथे दुरुस्तीसाठी घेऊन गेले असून, अद्याप ते यंत्र आलेले नाही. ते आल्यावर सातारा परिसरातही डास निर्मूलनासाठी औषध फवारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. सातारा आरोग्य उपकेंद्रात सुपरवायझर आर.टी. निकम, सिस्टर के. एस. वडमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे २४ कर्मचारी विविध वॉर्डात औषध फवारणी, पाण्याचे व रक्ताचे नमुने घेत असून, त्यांना ४५ ठिकाणच्या पाण्यात डासांची अंडी आढळून आली आहे. ८ ते १० नागरिकांना थंडीताप असल्याचे निदर्शनास आले आहे. तपासणी सुरू पथकाने प्रत्येक घरातील पाण्याचे नमुने तसेच रक्ताचे नमुने तपासले असून, ४१९ घरांतील २,७३३ महिला व पुरुष, मुलांची तपासणी केली असता १० जणांना थंडीताप आढळून आला, तर ४५ ठिकाणच्या पाण्यात डासांची अंडी आढळून आली. ४सातारा येथील ग्रामविकास अधिकारी बी. टी. साळवे म्हणाले की, परिस्थिती आटोक्यात असून, अ‍ॅबेट औषध पाण्यात टाकत असून जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.