लासूर स्टेशन हे जिल्ह्यातील मोठे व्यापारी केंद्र आहे. यामुळे वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकरी लासूर स्टेशनला येतात. तसेच येथील नागरिकांनाही वैजापूरला जावे लागते. मात्र, बससेवा नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. लॉकडाऊनपूर्वी येथून बससेवा सुरू होती. तिला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही होता. मात्र, आता ही बस बंद असल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे ही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी लासूर स्टेशन, ह. पिंपळगाव, कंरजगाव, दहेगाव, पालखेड, गोळवाडी व परिसरातील नागरिक करीत आहेत.
वैजापूर ते लासूर स्टेशन बससेवा सुरू करण्याची मागणी
By | Updated: December 4, 2020 04:10 IST