माजलगाव : आ. पंकजा पालवे यांना झेड सुरक्षेची गरज असून पोलीस प्रशासनाने त्यांना ही सुरक्षा द्यावी, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूराव पोटभरे यांनी गुरुवारी येथे पत्र परिषदेत दिली. ते म्हणाले, केंद्रीय मंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्या अकाली जाण्याने त्यांचा राजकीय वारसा चालविण्याची जबाबदारी पंकजा पालवे यांच्यावर येऊन ठेपली आहे. मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश केंद्राने दिलेले आहेत. मात्र अद्याप चौकशी झालेली नाही. त्यामुळे मृत्यूबाबत संशय कायम आहे. पंकजा पालवे यांना संरक्षणाची गरज आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आपण गृहमंत्री आर.आर. पाटील यांना भेटलो असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा न पुरविल्यास ७ जुलै रोजी उपोषणाचा इशारा पोटभरे यांनी दिला.(वार्ताहर)
पंकजा यांची सुरक्षा वाढविण्याची मागणी
By admin | Updated: June 27, 2014 00:09 IST