जालना : होळीनिमित्त पर्यावरणपूरक रंग म्हणून कोरडे रंगांचा वापर केला जातो. गत दोन ते तीन वर्षांपासून कोरड्या रंगांची मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. कोरडे रंग लावण्यास तसेच धुण्यास सुलभ असून, शरीरास कोणतीही अपाय होत नाही. लाल, केशरी, निळा, पिवळा तसेच हिरव्या रंगांची मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ओल्या रंगांमध्येही पेस्ट, रेडिमेड कलर, वॉटर कलरची बच्चे कंपनीतून मागणी आहे. गुजरात, मुंबई आदी ठिकाणाहून रंग विक्रीसाठी आणले जातात. रंग उडविण्यासाठी विविध आकाराच्या पिचकाऱ्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. साखर गाठ्यांची दुकानेही मोठ्या प्रमाणात थाटली आहेत. होळी पारंपरिक सोबतच अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी करण्याचे नियोजन केले आहे. हत्ती रिसाला मिरवणुकीचे जालनेकरांना यंदाही आकर्षण असून, रंगगाड्यांची प्रतीक्षा अबाल-वृद्धांना लागून आहे. (प्रतिनिधी)
कोरड्या रंगांची मागणी वाढली
By admin | Updated: March 11, 2017 23:53 IST