व्यंकटेश वैष्णव , बीडयेत्या खरीप हंगामाची कृषी विभागाने तयारी केली आहे. यंदा खरीपाच्या पिकासाठी रासायनिक खतांची मागणी २५१ लाख मेट्रीक टन एवढी आहे. मात्र प्रत्यक्ष १७२ लाख मेट्रीक टन एवढ्याच खताची मागणी (आवंटन) कृषी विभागाने केली असून, मागणी व पुरवठा यामध्ये चक्क ७९ लाख मेट्रीक टनाची तूट आहे.गतवर्षी खतांचा काही प्रमाणात तुटवडा झाल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. २०१५-१६ या वर्षातील हंगामी खरीपासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. यावेळी प्रधान सचिव संजय कुमार, उप महासंचालक अजय भूषण पांडे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सीईओ नामदेव ननावरे, जिल्हा कृषी अधिक्षक रमेश भताने यांची उपस्थिती होती. एकीकडे प्रशासन शेतकऱ्यांना रासायनिक खत कमी पडू देणार नाही असे म्हणत आहे. दुसरीकडे मागणीतच कुचराई केली जात असल्याचे आकडेवारीवरून पुढे आले आहे. यामुळे रासायनिक खतांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा खरे अशी स्थिती आज तरी पहावयास मिळत आहे.
मागणी अन् पुरवठ्यात ७९ लाख मेट्रीक टनाची तफावत
By admin | Updated: April 30, 2015 00:38 IST