शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

दिल्लीची महाराष्ट्रावर आठ गडी राखून मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:18 IST

प्रदीप सांगवान याची धारदार गोलंदाजी आणि ध्रुव शोरे याची नाबाद शतकी खेळी या बळावर दिल्लीने धर्मशाळा येथे शुक्रवारी झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील ब गटाच्या सामन्यात महाराष्ट्राची विजयी घोडदौड खंडित करताना ८ गडी राखून विजय मिळवला. या लढतीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीची आक्रमक फलंदाजी आणि विजय झोल याची धीरोदात्त खेळी हे महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.

ठळक मुद्देसांगवानचे ५ बळी, ध्रुवचे शतक : शमशुझमा काझी, विजय झोल यांची झुंजार फलंदाजी

औरंगाबाद : प्रदीप सांगवान याची धारदार गोलंदाजी आणि ध्रुव शोरे याची नाबाद शतकी खेळी या बळावर दिल्लीने धर्मशाळा येथे शुक्रवारी झालेल्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेतील ब गटाच्या सामन्यात महाराष्ट्राची विजयी घोडदौड खंडित करताना ८ गडी राखून विजय मिळवला. या लढतीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीची आक्रमक फलंदाजी आणि विजय झोल याची धीरोदात्त खेळी हे महाराष्ट्राच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले.दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला फलंदाजीस आमंत्रित केले. त्यानंतर सलग तिसºया सामन्यात विजय झोल आणि ऋतुराज गायकवाड यांनी महाराष्ट्राला ९ षटकांत ६१ धावांची सलामी दिली. ऋतुराज गायकवाड व कर्णधार राहुल त्रिपाठी २0 धावांच्या अंतराने बाद झाल्यानंतर विजय झोलने अंकित बावणे याच्या साथीने तिसºया गड्यासाठी ३५ आणि शमशुझमा काझी याच्या साथीने सातव्या गड्यासाठी २४ धावांची भर घालत डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला; परंतु तो तंबूत परतल्यानंतर महाराष्ट्राची स्थिती ७ बाद १७२ अशी बिकट झाली. अशा परिस्थितीत अष्टपैलू खेळाडू शमशुझमा काझीने हल्लाबोल करताना अनुपम संकलेचा याच्या साथीने ३६ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी करताना महाराष्ट्राला ५0 षटकांत सर्वबाद २४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. शमशुझमाने महाराष्ट्रातर्फे सर्वाधिक ६२ चेंडूंत ६ सुरेख चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची जिगराबज खेळी केली. विजय झोल याने ९३ चेंडूंत ३ चौकारांसह ४६ धावांची धीरोदात्त खेळी केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने २८ चेंडूंतच ६ चौकार आणि २ षटकारांसह स्फोटक ४१ धावा केल्या. अनुपम संकलेचाने २२ व अंकित बावणे याने १८ धावांचे योगदान दिले. दिल्लीकडून प्रदीप सांगवान याने ४१ धावांत ५ व पवन नेगी याने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात दिल्लीने विजयी लक्ष्य ४४.१ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून ध्रुव शोरे याने १२१ चेंडूंत १६ चौकारांसह नाबाद १0३, हितेन दलाल याने ८७ आणि नितीश राणा याने नाबाद ४९ धावा केल्या. महाराष्ट्राकडून श्रीकांत मुंढे व अनुपम संकलेचा यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.संक्षिप्त धावफलकमहाराष्ट्र : ५0 षटकांत सर्वबाद २४६. (शमशुझमा काझी ५९, विजय झोल ४६, ऋतुराज गायकवाड ४१, अनुपम संकलेचा २२, अंकित बावणे १८. प्रदीप सांगवान ५/४१, पवन नेगी ३/४0).दिल्ली : ४४.१ षटकांत २ बाद २५0. (ध्रुव शोरे नाबाद १0३, हितेन दलाल ८७, नितीश राणा नाबाद ४९. अनुपम संकलेचा १/४४, श्रीकांत मुंढे १/५0).