शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक गुंत्यात अडकला पदवीचा निकाल; विद्यापिठाचे पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले

By पंकज पाटील | Updated: August 2, 2022 16:21 IST

सर्व अभ्यासक्रमाच्या निकालांना पुढील आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

औरंगाबाद : पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले. मात्र, दोन मूल्यांकन केंद्रातील आकडेवारीच्या तांत्रिक गुंत्यात निकाल अडकला आहे. निकालात त्रुटी राहू नये या काळजीत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा निकाल लांबला आहे. त्यामुळे नियोजित पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रकही कोलमडले आहे.

कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी जुलैपूर्वी निकाल जाहीर होऊन १ ऑगस्टपासून पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू होऊ शकेल असे गेल्या आठवड्यात स्पष्ट केले होते. त्या दृष्टीने पदवी परीक्षेच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली. गेल्या चार दिवसांत कमी विद्यार्थी असलेल्या १० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीरही झाले. मात्र, तो डेटा फिडिंग करताना दोन कॅस सेंटरवर तांत्रिक अडचणी आल्या आहे. सर्वच पदवी परीक्षार्थ्यांना असलेल्या महत्त्वाच्या विषयाच्या डेटात या अडचणी दिसून आल्याने या अडचणी दूर करण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देऊन काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर बुधवारपासून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. सर्व अभ्यासक्रमाच्या निकालांना पुढील आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता विद्यापीठ प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली.

युद्धपातळीवर काम सुरू आहेपदवी परीक्षेच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले. मात्र, दोन केंद्रावरील डेटा एन्ट्रीत तांत्रिक अडचणी उद्भवल्या. त्या अडचणी दुर करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळही देण्यात आले असून युद्धपातळीवर काम सुरू आहे. निकालात त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेत दोन दिवसांत निकाल जाहीर व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर आठ ते दहा दिवसांत सर्व पदवी निकाल जाहीर होतील.- डाॅ. श्याम शिरसाट, प्र. कुलगुरू, डाॅ. बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

सर्व निकाल लागल्यानंतरचे प्रवेश प्रक्रियाकुलगुरूंनी प्रवेश समितीची सोमवारी बैठक झाली. या बैठकीत परीक्षा संचालकांकडून निकालाची स्थिती जाणून घेण्यात आली. पुढील आठवडाभरात निकाल लागण्याची शक्यता आहे. १०० टक्के निकाल लागताच प्रवेश समिती प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करून प्रक्रिया सुरू करेल.-डाॅ. एस. टी. गायकवाड, अध्यक्ष, पदव्युत्तर प्रवेश समिती, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र