शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 23:36 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तरच्या परीक्षांना ५ एप्रिलपासून सुरुवात करण्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.

ठळक मुद्देविद्यापीठ : परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब; ४ लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करणार

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या पदवी परीक्षांना २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पदव्युत्तरच्या परीक्षांना ५ एप्रिलपासून सुरुवात करण्यावर परीक्षा मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले.विद्यापीठाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानुसार पदवी परीक्षा १९ मार्च तर पदव्युत्तर परीक्षा २३ मार्चपासून सुरू होणार होत्या. मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातच विद्यापीठाच्या पुनर्तपासणीचे निकाल, ‘नॅक’कडून २५, २६ आणि २७ मार्चदरम्यान होणाऱ्या मूल्यांकनामुळे परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा अंतिम करण्यासाठी परीक्षा मंडळाची बैठक कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.१३) पार पडली. या बैठकीत पदवी परीक्षा २७ मार्च आणि पदव्युत्तर परीक्षा ५ एप्रिलपासून सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीत उत्तरपत्रिकांच्या खरेदीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. यात परीक्षा विभागाने शिल्लक उत्तरपत्रिकांचे महाविद्यालयांना केलेल्या वाटपाची आकडेवारी सादर केली. त्यानुसार आतापर्यंत जालना, बीड, उस्मानाबाद येथील परीक्षा केंद्रांना पुरेशा प्रमाणात उत्तरपत्रिकांचे वाटप केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील काही परीक्षा केंद्रांवर वाटप करण्यास उत्तरपत्रिकाच शिल्लक नसल्यामुळे चार लाख उत्तरपत्रिकांची खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. खरेदीची प्रक्रिया खरेदी समितीमार्फतच करण्याची आग्रही मागणी परीक्षा मंडळाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी केल्याचे समजते. यामुळे मागील तीन वर्षांपासून १२ ते १३ रुपयांप्रमाणे खरेदी करणाºया उत्तरपत्रिका मागील वेळी निविदा मागवून खरेदी केल्या तेव्हा ८ रुपयांत मिळाल्या होत्या. यावेळीही निविदा प्रक्रियेनेच उत्तरपत्रिकांची खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.------------

टॅग्स :Educationशिक्षणexamपरीक्षा