राजेश खराडे , बीडनिसर्ग कोपल्याने शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. कर्ज-पाणी करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीपाचा पेरा केला खरा मात्र, पिकांची मशागत करण्याच्या काळातच शेतकऱ्यांना सबंध पिकावरच नांगुर फिरवण्याची वेळ आली आहे. पावसाने ओढ दिल्याने गत आठवड्यात खरीपाच्या पेरणीची शुन्य टक्के नोंद झाली आहे. पाऊस पडला तर दुबार नाहीतर रब्बीची तयारी या उद्देशाने खरीपातील पिके मोडली जात आहेत. यंदा जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पावसाचे जिल्ह्यात आगमन झाले होते. पहिल्या पावसाच्या जोरावरच खरीपाच्या पेऱ्याला सबंध जिल्ह्यात सुरवात करण्यात आली. कमी-जास्त पावसाच्या जोरावर १५ जुन ते १५ जुलै या महिन्याभराच्या कालाधीत ९३ टक्के खरीपाची पेरणी करण्यात आली होती. पावसाने ओढ दिल्याने पेरणीत घट झाली आहे. गत आठवड्यात तर जिल्ह्यात शुन्य टक्के पेरणी झाली असल्याची नोंद कृषि विभागाकडे झाली आहे. सद्य स्थितीला ५ लाख २१ हजार ३४४ हेक्टरवर खरीपाचा पेरा झाला आहे. ३१ जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास २ लाख ३४ हजार ५४३ हेक्टरावरील पिकांची मोडणी होणार आहे तर २ लाख १४ हजार ६३७ हेक्टरवर दुबार पेरणी होणार असल्याचा अंदाज कृषि विभागाने वर्तविला आहे. दुबार पेरणीलाही आवश्यक असणारा पाऊस अजून तरी जिल्ह्यात दाखल झालेला नाही. त्यामुळे अडीच लाख हेक्टरच्या खरीपावर धोक्याची घंटा आहे. खरीपातील सर्व पिके कोमजली असून शेतकरी हताश झाला आहे. पावसाच्या आशेवर पिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करून पिकांची जपवणूक करण्याचा केविलवाणा प्रयत्न शेतकऱ्यांकडून करण्यात आला. मात्र पासवसाने पाठ रविल्याने शेतकरी हताश झाला आहे. पिकांचा सर्वाधिक उत्पादन बाजूलाच आर्थिक फटकाचपेरणीपुर्व मशागतीपासून लागणारा बारदाना ते बि-बीयाणे खरेदीपर्यंत शेतकऱ्यांना एकरी ५ हजार मोजावे लागले होते. लागवडीच्या पिकातून उत्पादन तर सोडच मात्र झालेला खर्च निघाला नाही. शिवाय पिकांची मोडणी करण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी दिवसेंदिवस कर्जाच्या खाईत डुबत आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले तरी दीड महिन्यापूर्वी मंजूर झालेला पीकविमा पदरात पडलेला नाही.४बँकांकडून पीककर्जाची प्रकरणेही प्रलंबित ठेवली जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे.४काही शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून पेरणी केली होती. मात्र, आता व्याजाचा पैसा व मुद्दल देणार कशी ? हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांना सतावतो आहे.
पेरणीत घट, मोडणीत वाढ
By admin | Updated: July 27, 2015 01:13 IST