वेरूळ लेणी
१७ जूनपासून जगप्रसिद्ध वेरूळ लेणी पर्यटकांसाठी खुली करण्यात आली. देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र असलेल्या लेण्या बघण्यासाठी दररोज ६०० ते ७०० पर्यटकच येतात. शनिवार आणि रविवारी लेणी बंद असते. ही बाब असंख्य पर्यटकांना माहीत नाही. त्यामुळे लेणी बंद असल्याचे पाहून पर्यटकांचा हिरमोड होतो. मागील चार महिन्यांत किमान ८५ हजार पर्यटकांनी लेणीला भेट दिली. यातून पर्यटन विभागाला ३२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
अजिंठा लेणी
२७ जुलैपासून अजिंठा लेणी पर्यटकांसाठी खुल्या करण्यात आल्या. या लेणीतील चित्रकृती जगभरातील पर्यटकांना माेहिनी घालतात. कोरोनाच्या संसर्गानंतर चार महिन्यांत १७ हजार ७०० पर्यटकांनी या लेणीला भेट दिली, त्यातून सुमारे दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. शनिवार, रविवारी ही लेण्याही बंद ठेवण्यात येते.
बीबी का मकबरा
जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार १७ जूनपासून मकबरा खुला करण्यात आला. दोन शिफ्टमध्ये पर्यटकांना आत सोडावे असे आदेश आहेत. त्यामुळे पर्यटन विभाग सकाळी ५०० आणि सायंकाळी ५०० पर्यटकांनाच तिकीट वाटप करीत आहे. त्यामुळे दररोज ८०० ते १००० पर्यटकच मकबरा पाहू शकतात. महिन्याला किमान २७ ते ३० हजार पर्यटक येतात. चार महिन्यांत ९० हजार पर्यटकांना मकबरा पाहिला.