शहरं
Join us  
Trending Stories
1
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
2
'उपमुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडून मदत घेण्याचे सांगितले' अकोल्याच्या माजी आमदारांना बदमाशांकडून फसवण्याचा प्रयत्न
3
IND vs PAK: पाकिस्तानचं 'संडे' रूटीन- भारताविरूद्ध खेळा, हरा आणि घरी जा! सलग ४ रविवार पराभव
4
अपघात प्रकरणात गौतमी पाटीलला 'क्लीन चीट', पोलिसांनी सांगितले, 'गुन्हा दाखल होऊ शकत नाही'
5
गिफ्ट मिळालेली 'HAVAL H9' कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकणार नाही; कारण ऐकून व्हाल हैराण
6
शिंदेसेना-भाजपा नेत्यांमध्ये कुरघोडी सुरूच; स्थानिक निवडणुकांपूर्वीच महायुतीत उडू लागले खटके
7
शाहरुख खानच्या मागे उभी असलेली ज्युनिअर आर्टिस्ट, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्याची बायको
8
हृदयद्रावक! छोट्या भावाच्या मृत्यूचा धक्का, दादाला आला हार्ट अटॅक; प्रेग्नंट वहिनी कोसळली अन्...
9
Video: डोकं फोडलं, रक्तबंबाळ केलं..; भाजपच्या आमदार-खासदारवर जमावाचा जीवघेणा हल्ला
10
वकिलाने वस्तू भिरकावल्यावर सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “तुम्ही...”
11
NPS आता म्युच्युअल फंडासारखं काम करणार! पैसे काढण्याचे नियम बदलले; १००% इक्विटीचा पर्याय
12
बिहारमध्ये कितपत खरे ठरले होते ओपिनियन पोल? आताच्या सर्व्हेत कुणाचं सरकार? 'इंटरेस्टिंग' आहेत आकडे!
13
'तू इथेच थांब, मी आलेच...'; सख्ख्या भावाच्या हातावर तुरी देऊन बहिणीच्याच नवऱ्यासोबत पळून गेली तरुणी!
14
“‘आय लव्ह मोहम्मद’ यात काही वाईट-चुकीचे नाही”; धीरेंद्र शास्त्रींना नेमके म्हणायचे तरी काय?
15
'सैयारा' फेम अहान पांडेच्या आगामी सिनेमाची चर्चा, 'ही' मराठी अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार?
16
सोनम वांगचुकच्या अटकेबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली; पत्नी गीतांजली यांनी केल्या दोन मागण्या
17
आता परतीचे दोर नाही, युतीची चर्चा फार पुढे गेलीय; मनसेसोबतच्या युतीवर संजय राऊत असं का म्हणाले?
18
Manas Polymers Listing: १५३ रुपयांवर लिस्ट झाला हा स्वस्त IPO; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना ९०%चा फायदा, झाले मालामाल
19
राम मंदिरावर लक्ष्मी प्रसन्न! १५३ कोटी दान, १७३ कोटी बँक व्याज; कमाई आकडे पाहून व्हाल अवाक्
20
३ महिने भरपूर पैसा, ४ राशींचे आयुष्यच बदलेल; कल्पनेपलीकडे यश-लाभ, बाबा वेंगांचे मोठे भाकित!

परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय

By admin | Updated: March 27, 2015 00:44 IST

औरंगाबाद : विद्यापीठाच्या काही संलग्नित महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी पत्रकारिता व ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही संलग्नित महाविद्यालयांचा अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे त्यांनी पत्रकारिता व ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आणि परीक्षा मंडळाने विनाव्यत्यय ती मान्यही केली. या दोन्ही अभ्यासक्रमांच्या परीक्षा आता १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यानिमित्ताने विद्यापीठ वर्तुळात प्रश्न उपस्थित झाला आहे की, दोष कोणाचा आणि शिक्षा कोणाला?विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये पत्रकारिता अभ्यासक्रमाची ६ आणि ग्रंथालयशास्त्र अभ्यासक्रम शिकविणारी ६, अशी एकूण १२ खाजगी महाविद्यालये कार्यरत असून, जवळपास दीड ते दोन हजार विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. यापैकी बहुतांश महाविद्यालयांमध्ये नियमानुसार पूर्णवेळ प्राचार्य नाहीत. शिकविण्यासाठी पात्र शिक्षक नाहीत. तरीदेखील अशा महाविद्यालयांना विद्यापीठ दरवर्षी विनाअट संलग्नता देते. या महाविद्यालयांमध्ये पात्र शिक्षकच नसल्यामुळे नियमित वर्ग होत नाहीत. मग, विहित कालावधीत ते अभ्यासक्रम पूर्ण करणार कसा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तरीदेखील शिक्षण संस्थाचालक काही मंडळींना पकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करतात. ही मागणी परीक्षा मंडळाच्या बैठकीत विनाव्यत्यय मान्यही होते. शिक्षण संस्थाचालकांची ही खेळी विद्यापीठाच्या विकासासाठी मारक ठरणार असून, कुलगुरूंनी अशा संस्थाचालकांच्या मागण्यांना भीक न घालता कडक भूमिका घ्यावी, अशी यानिमित्ताने मागणी पुढे आली आहे. खाजगी महाविद्यालयांतील ग्रंथालयशास्त्र आणि पत्रकारितेच्या दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने या दोन्ही विद्याशाखांच्या परीक्षा आज गुरुवारपासून (२६ मार्च) सुरू होणार होत्या, त्या आता १० एप्रिलपासून घेतल्या जातील, असे विद्यापीठाच्या परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.