शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

या निर्णयामुळे राज्यातील लॉटरी विक्रेत्यांचे नशीब फिरले; वर्षभरात साडेसात लाख झाले बेरोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 13:25 IST

परराज्यातील लॉटरीवर महाराष्ट्रात २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे लॉटरी विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी, मागील वर्षभरात राज्यातील ७ लाख ६५ हजार विक्रेत्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.

ठळक मुद्दे राज्य शासन स्वत:ची आॅनलाईन लॉटरी १२ टक्के जीएसटी आकारून सुरू करील, या आशेवर उर्वरित ३५ हजार विक्रेते तग धरून आहेत

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : परराज्यातील लॉटरीवर महाराष्ट्रात २८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे लॉटरी विक्रेत्यांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी, मागील वर्षभरात राज्यातील ७ लाख ६५ हजार विक्रेत्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे. राज्य शासन स्वत:ची आॅनलाईन लॉटरी १२ टक्के जीएसटी आकारून सुरू करील, या आशेवर उर्वरित ३५ हजार विक्रेते तग धरून आहेत, अशी धक्कादायक माहिती महाराष्ट्र राज्य आॅनलाईन लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास सातार्डेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. 

लॉटरी खेळणे चांगले की वाईट, हा वादाचा विषय आहे. मात्र, सरकारमान्य अधिकृत व्यवसायात लॉटरीचा समावेश होतो. राज्यात मटका, जुगारासारखे अवैध धंदे बोकाळले होते. त्याला लगाम घालण्याकरिता शासनाने राज्यात शासकीय लॉटरी १९६७ मध्ये सुरू केली. २००३ पासून राज्यात परराज्यातील आॅनलाईन लॉटरी विक्री सुरू झाली. यात गोवा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, नागालँड या पाच राज्यांतील आॅनलाईन लॉटरीचे दररोज दिवसभरात ८२ ड्रॉ काढण्यात येत असत.

यासंदर्भात विलास सातार्डेकर यांनी सांगितले की, जीएसटीपूर्वी लॉटरीच्या किमतीतून बक्षिसांची रक्कम वजा करून जी रक्कम उरते त्यावर कर लावण्यात येत असे. मात्र, १ जुलै २०१७ पासून जीएसटी लागू झाला आणि लॉटरीच्या संपूर्ण रकमेवर २८ टक्के जीएसटी आकारण्यात येऊ लागला. यामुळे तेवढी रक्कम बक्षिसातून वजा करण्यात आली. परिणामी, ग्राहकांचे आॅनलाईन लॉटरीचे आकर्षण कमी झाले. उलाढाल घटल्याने दुकानाचे भाडेही निघेना. परिणामी, राज्यातील ८ लाखांपैकी मागील वर्षभरात ७ लाख ६५ हजार विक्रेते व्यवसायातून बाहेर पडले. सातार्डेकर म्हणाले की, ‘एक देश, एक कर’प्रणाली असे म्हणत केंद्राने जीएसटी लागू केला. मात्र, लॉटरीमध्ये परराज्यातील आॅनलाईन लॉटरीवर २८ टक्के, तर महाराष्ट्रातील लॉटरीवर १२ टक्के जीएसटी आकारला जात आहे. येथे मात्र एक कर प्रणालीला फाटा देण्यात आला आहे. 

राज्य सरकारने आश्वासन दिले होते की, शासन आॅनलाईन लॉटरी सुरू करणार आहे. मात्र, जिथे जीएसटीपूर्वी लॉटरीतून राज्य शासनाला २०० कोटी रुपये कर मिळत होता. तिथे आता जीएसटीतून सुमारे १ हजार कोटी कर मिळाला आहे. एवढी दुकाने बंद होऊनही महसूल जास्त जमा झाल्याने राज्य शासन आॅनलाईन लॉटरी सुरू करीत नसल्याचा आरोप त्यांनी केला. 

पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन औरंगाबादेतील राज्य लॉटरी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विलास खंडेलवाल यांनी सांगितले की, लॉटरी व्यावसायिकांना वाचविण्यासाठी राज्य संघटनेने येत्या पावसाळी अधिवेशनात धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने स्वत:ची आॅनलाईन लॉटरी सुरू करावी, जीएसटीनुसार देशभरात एक समान कर आकारण्यात यावा, लॉटरी विक्रीत कमिशन वाढविण्यात यावे,  लॉटरी व्यवसायाला उद्योगाचा दर्जा मिळावा, अधिकृत लॉटरी विक्रेत्यास सरकारने ओळखपत्र द्यावे, या मागण्यांसाठी आंदोलन केले जाणार आहे. 

टॅग्स :GSTजीएसटीState Governmentराज्य सरकार