शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

नादरपूर ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यांना अपात्र ठरविणारा निर्णय खंडपीठाकडून रद्द 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 19:16 IST

कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांना अपात्र ठरविणारा जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्तांचा आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी रद्द केला. जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात फेरसुनावणी घेण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देनादरपूर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक आॅगस्ट २०१५ साली झाली होती.हिशेब सादर न केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी नऊही सदस्यांचे पद २३ फेब्रुवारी २०१६ रोजी रद्द केले.

औरंगाबाद : कन्नड तालुक्यातील नादरपूर येथील ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांना अपात्र ठरविणारा जिल्हाधिकारी व अप्पर आयुक्तांचा आदेश उच्च न्यायालयाच्याऔरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी रद्द केला. जिल्हाधिकार्‍यांनी यासंदर्भात फेरसुनावणी घेण्याचा आदेश दिला.

नादरपूर येथील ग्रामपंचायतीची निवडणूक आॅगस्ट २०१५ साली झाली होती. त्यावेळी नऊ ग्रामपंचायत सदस्यांपैकी आठ सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती, तर एक सदस्य निवडून आला होता. नियमाप्रमाणे एका महिन्यात सदस्यांनी निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करणे आवश्यक असते; पण हिशेब सादर न केल्याने जिल्हाधिकार्‍यांनी नऊही सदस्यांचे पद २३ फेब्रुवारी २०१६ रोजी रद्द केले. त्याविरोधात सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे धाव घेतली. आयुक्तांनी त्यांचे अपील फेटाळले. त्या नाराजीने त्यांनी अ‍ॅड. रवींद्र गोरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. 

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम १४(ब) नुसार निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या वेळेत निवडणूक खर्चाचा हिशेब देण्यास कसूर केली व त्याबाबत त्यांच्याकडे योग्य कारण नसल्यास त्यांचे पद रद्द करण्याची कायद्यात तरतूद आहे. जिल्हाधिकार्‍यांनी सदस्यांचे पद रद्द करताना त्यांना सुनावणीची संधी दिली नाही. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन झाले, असा युक्तिवाद करण्यात आला. सुनावणीअंती खंडपीठाने जिल्हाधिकारी आणि अप्पर विभागीय आयुक्तांचा आदेश रद्द केला. जिल्हाधिकार्‍यांना फेरसुनावणीचा आदेश दिला. अ‍ॅड. गोरे यांना अ‍ॅड. नारायण मातकर व अ‍ॅड. चंद्रकांत बोडखे यांनी सहकार्य केले. अ‍ॅड. विशाल बडाक यांनी राज्य शासनाची बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयAurangabadऔरंगाबाद