शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

‘त्या’ ५२ संचिकांचा निर्णय आता आयुक्तांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:13 IST

जिल्हा परिषद सिंचन विभागातील ‘त्या’ ५२ संचिकांपैकी २९ सिमेंट बंधा-यांची कामे पूर्ण झाली असून, संबंधित कंत्राटदारांची मागील ७ महिन्यांपासून २ कोटी ३७ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आलेली नाहीत.

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषद सिंचन विभागातील ‘त्या’ ५२ संचिकांपैकी २९ सिमेंट बंधा-यांची कामे पूर्ण झाली असून, संबंधित कंत्राटदारांची मागील ७ महिन्यांपासून २ कोटी ३७ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आलेली नाहीत. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांनी सदरील कंत्राटदारांची बिले अदा करण्यासंबंधीचे आदेश प्रशासनाला दिले. तथापि, या वादग्रस्त संचिकांबाबत प्रशासनाने विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन मागितले आहे. दोन दिवसांत यासंबंधीचे मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा वर्तवली जात आहे.विद्यमान जि.प. सदस्य मंडळ अस्तित्वात आल्यानंतर एप्रिल महिन्याच्या तिस-या आठवड्यात अध्यक्षांनी जिल्हा परिषदेतील सर्व विभागांकडून खर्चाचा आढावा घेतला. तेव्हा सिंचन विभागाने मार्चनंतरही काही कामांना कार्यारंभ आदेश दिल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार अध्यक्षांनी सिंचन विभागातील जवळपास तीन- साडेतीन कोटी रुपयांच्या निधीतून सिमेंट बंधारे उभारण्याच्या ५२ संचिका ताब्यात घेतल्या. तेव्हा त्या संचिकांमध्ये तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा व कार्यकारी अभियंता विनायक पांढरे यांनी चुकीचे कार्यारंभ आदेश दिल्याचे आढळून आले. ही बाब अध्यक्षा डोणगावकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिली व दोषींविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना केल्या. तेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी वित्त विभागातील अधिका-यांची याप्रकरणी एक चौकशी समिती नेमली. या समितीने सदरील संचिकातील काही कामांना वित्त विभागाची मान्यता न घेता तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी स्वत:च्या अधिकारातच कार्यारंभ आदेश दिल्याचा चौकशी अहवाल सादर केला.प्राप्त चौकशी अहवालानुसार पदाधिका-यांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना भेटले व सदरील अनियमिततेबद्दल तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश बेदमुथा व कार्यकारी अभियंता विनायक पांढरे यांना दीर्घ रजेवर पाठविण्याची मागणी केली. तथापि, सुरेश बेदमुथा यांनी विभागीय आयुक्तांना कळविले की, सदरील संचिकांवर निर्णय घेण्यापूर्वी त्या अनेकवेळा वित्त विभागातील अधिका-यांकडे सादर करण्यात आल्या होत्या.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाºयांना असलेल्या अधिकारानुसार आपण सदरील संचिकांना कार्यारंभ आदेश दिले. त्यावर कार्यकारी अभियंत्यांच्या स्वाक्षºयादेखील आहेत.दरम्यान, या प्रकरणात बेदमुथा व पांढरे यांना प्रशासनाने दीर्घ रजेवर पाठविले. नंतर बेदमुथा यांनी आपली बदली जालना येथे करून घेतली, तर पांढरे यांना अजूनही प्रशासनाने रुजू करून घेतलेले नाही. प्रशासन आणि पदाधिका-यांच्या भांडणात संबंधित कंत्राटदारांनी २९ कामे पूर्ण केली असून, आपण या वादात भरडले जात असल्याचे लक्षात येताच बिले मागण्यासाठी जिल्हा परिषदेत चकरा मारल्या; पण त्यांना बिले अदा करण्यात आलेली नाहीत.अलीकडे, कंत्राटदारांनी बिलांसाठी सातत्याने मागणी लावून धरली. दुसरीकडे, या ५२ संचिकांबाबत अध्यक्षांचाही रोष आता मावळला आहे. त्यांनी प्रशासनाला ५२ पैकी २९ कामे पूर्ण झाली असून, संबंधित कंत्राटदारांची बिले अदा करण्याच्या सूचना के ल्या; परंतु प्रशासनाने यासंबंधी विभागीय आयुक्तांचे मार्गदर्शन घेण्यासाठी सदरील संचिका पुन्हा एकदा सादरके ल्या आहेत.