शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारच्या धडकेने तृतीयपंथीयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:20 IST

बीड बायपासवरील आदित्य हॉटेलसमोर उभ्या असलेल्या चार तृतीयपंथीयांना भरधाव कारने उडविले. या भीषण अपघातात एका तृतीयपंथीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तिघांवर घाटीत उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि.२४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बीड बायपासवरील आदित्य हॉटेलसमोर उभ्या असलेल्या चार तृतीयपंथीयांना भरधाव कारने उडविले. या भीषण अपघातात एका तृतीयपंथीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तिघांवर घाटीत उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात शुक्रवारी (दि.२४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडला. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.राजू हरीशचंद्र लोहाडे (३८, रा. चित्तेपिंपळ्गाव) असे अपघातातील मयताचे नाव आहे. रोहन सांळुखे, मुकेश कदम आणि मंदा जाधव अशी जखमींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पुंडलिकनगर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे म्हणाले की, तृतीयपंथी राजू लोहाडे, रोहन साळुंखे, मुकेश कदम व मंदा जाधव हे शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास बीड बायपास रोडवरील आदित्य हॉटेलसमोर उभे होते. यावेळी झाल्टा फाट्याकडून आलेल्या भरधाव कारने त्यांना उडविले.हा अपघात एवढा भीषण होता की, राजू लोहाडे याच्या डोक्याचा चेंदामेंदा होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अन्य तीन जण दूर फेकले गेले. या घटनेची माहिती प्रत्यक्षदर्शींनी पुंडलिकनगर पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी राजू यास तपासून मृत घोषित केले. इतरांवर उपचार सुरू आहेत.मयत राजू लोहाडे हा विवाहित असून त्याला मुलगा, पत्नी व आई-वडील असा परिवार होता. वर्षभरापासून तो तृतीयपंथीयाप्रमाणे साडी-ब्लाऊज परिधान करून फिरत असे. गेल्या काही दिवसांपासून तो तृतीय पंथीयांसोबतच राहत असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. या घटनेची नोंद पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली.