इस्लापूर : मौजे रिठा शिवारात नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेतून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला़ याप्रकरणी स्टेशन मास्टर अजित कुमार यांच्या फिर्यादीवरुन इस्लापूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.मौजे रिठा शिवारात पुरुष जातीचे वय अंदाजे ३० वर्षे, रंग गव्हाळ, शरीर बांधा सडपातळ उंची १६५ से.मी. अंगावरील कपडे, काळ्या रंगाचा जीन्स पँट, काळा चौखडा शर्ट, डोक्याचे केस बारीक काळे, दाढी वाढलेली असे तरुणाचे वर्णन आहे. ३० आॅगस्ट रोजी नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेतून पडून रिठ्ठा शिवारात पडून मृत्यू पावला. त्याची खबर अजित कुमार रेल्वे स्टेशन मास्टर सहस्त्रकुंड यांनी दिल्याने इस्लापूर ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली़ त्यांची ओळख अद्याप पटली नाही़ (वार्ताहर)
रेल्वेतून पडून एकाचा मृत्यू
By admin | Updated: September 4, 2014 00:20 IST