शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद येथे जखमी गर्भवतीचा मृत्यू, चार जणांविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 00:03 IST

दहा दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून मारहाणीत जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान ११ फेबु्रवारी रोजी रात्री अडीच वाजता मृत्यू झाला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पैठणगेट येथे झाली. याप्रकरणी घराशेजारी राहणाºया चार जणांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दहा दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून मारहाणीत जखमी झालेल्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान ११ फेबु्रवारी रोजी रात्री अडीच वाजता मृत्यू झाला. ही घटना २ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पैठणगेट येथे झाली. याप्रकरणी घराशेजारी राहणाºया चार जणांविरोधात क्रांतीचौक ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद झाला.मंजूषा अजय कदम (३१, रा. पैठणगेट) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मानव दीपक कदम, सचिन सातपुते, गोट्या क ांबळे, आदित्य उबाळे यांचा आरोपींत समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास गल्लीत हळदीचा कार्यक्रम सुरू असताना आरोपी मानव कदम, त्याचे साथीदार सातपुते, गोट्या कांबळे, आदित्य उबाळे यांनी मंजूषा यांचा पुतण्या शेखर कदम याला मारहाण केली होती. यावेळी शेखरचे काका राजेश कदम हे घराबाहेर आले असता आरोपींनी त्यांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भांडण सोडविण्यासाठी आलेल्या शेखरच्या काकू सविता व मंजूषा यांनाही मारहाण करण्यात आली. दोन महिन्यांच्या गर्भवती मंजूषा यांच्या पोटात लाथा आणि बुक्के मारण्यात आल्याने त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे त्यांना लगेच खाजगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. तेथे मंजूषा यांची प्रकृती तपासून डॉक्टरांनी त्यांचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. नंतर मात्र त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. घाटीतील डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. त्यानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. उपचार सुरू असताना रविवारी रात्री मंजूषा यांचा मृत्यू झाला. यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी शेखर कदम यांनी फिर्याद नोंदविली आहे.५ रोजी दिला होता अर्जशेखर कदम याने या घटनेनंतर क्रांतीचौक पोलिसांना ५ फेबु्रवारी रोजी आरोपींविरोधात तक्रार अर्ज दिला होता. या अर्जात त्याने मानव कदम याने केलेल्या मारहाणीमुळेच मंजूषा यांचा गर्भपात झाल्याचे नमूद केले होते. पोलिसांनी मात्र आठ दिवस चौकशीत खर्च केले. दरम्यान, मंजूषा यांचा उपचारादरम्यान रविवारी रात्री मृत्यू झाला.