शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

इराणमधील वादळात औरंगाबादच्या तरुणाचा मृत्यू

By admin | Updated: March 19, 2016 01:08 IST

औरंगाबाद : इराणमधील ‘लायन ओनर्स स्टार बुशर फोर्ट’या कंपनीत कर्मचारी असलेल्या औरंगाबादच्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : इराणमधील ‘लायन ओनर्स स्टार बुशर फोर्ट’या कंपनीत कर्मचारी असलेल्या औरंगाबादच्या २० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे. १५ मार्च रोजी रात्री १.३० वा. (भारतीय वेळेनुसार) जहाज वादळात सापडून झालेल्या या दुर्घटनेत पलाश दत्तात्रय बलशेटवार (रा.सुमंगल विहार, मोरेश्वर हाऊसिंग सोसायटीजवळ, गारखेडा) याचा दुर्दैवी अंत झाला आहे. इराणच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क करून याप्रकरणी माहिती संकलित केली जात आहे. पलाशच्या मृत्यू वार्तेमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दत्तात्रय यांना पलाश हा एकुलता एक मुलगा होता. पलाशच्या मृत्यूची वार्ता येताच गारखेडा परिसरातील सुमंगल विहारात शोककळा पसरली. पलाश काही महिन्यांपूर्वी मुंबईच्या एका एजन्सीमार्फत इराणच्या मर्चंट नेव्हीमध्ये कामाला गेला होता. तो लायन ओनर्स स्टार बुशर फोर्ट या कंपनीच्या जहाजावर कार्यरत होता. त्याच्यासोबत आणखी सहा भारतीय तरुण त्या जहाजावर कामाला होते. १५ मार्च रोजी झालेल्या घटनेत पलाशसह असलेल्या सात भारतीय तरुणांपैकी एक जण जखमी आहे. उर्वरित पाच जणांना किरकोळ इजा झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. शहरात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पलाश बलशेटवार याने मुंबईतील सिरँक कन्सलटन्सीमध्ये नेव्हीचे प्रशिक्षण घेतले. त्याच कंपनीच्या माध्यमातून त्याला इराणच्या लायन ओनर्स स्टार बुशर फोर्ट येथे नेव्हीत नोकरी मिळाली होती. २४ डिसेंबर २०१५ रोजी तो इराणला रवाना झाला होता. १५ मार्च रोजी रात्री पलाशच्या नातेवाईकाच्या मोबाईलवर तो मृत्युमुखी पडल्याचा मॅसेज मॅसेंजरवरून येऊन धडकला. पलाशचे वडील दत्तात्रय यांनी इराणच्या भारतीय राजदूतांशी संपर्क साधला, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्यांनी माजी नगरसेवक सुशील खेडकर यांना संपर्क केला. त्यानंतर खा.चंद्रकांत खैरे यांच्याशी संपर्क केला. दिल्लीतून इराणच्या परराष्ट्र खात्याशी संपर्क केल्यानंतर समजले की, पलाश ज्या भागामध्ये काम करतो, त्या ठिकाणी काही दिवस सुट्ट्या आहेत. त्यामुळे त्याचा मृतदेह भारतात येण्यास विलंब होईल.