शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

वर्षभरात १,५२९ बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:30 IST

शहरात दरवर्षी ५० हजार बालकांचा जन्म होतो. यातील १५२९ बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरात दरवर्षी ५० हजार बालकांचा जन्म होतो. यातील १५२९ बालकांचा वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यू होतो, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना २०१६ मधील जन्म आणि मृत्यूदराची आकडेवारी मनाला चटका लावून जाणारी आहे.मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने येथे रुग्ण येतात. घाटीच्या प्रसूतीशास्त्र विभागात दररोज ५० ते ७० बाळांचा जन्म होतो. याशिवाय महापालिकेतील पाच रुग्णालये, खाजगी रुग्णालयांमध्ये गरोदर महिलांची प्रसूती होते. शहरात कोणत्याही दवाखान्यात जन्म घेतलेल्या बाळाचे बर्थ सर्टिफिकेट महापालिकेतच घ्यावे लागते. प्रत्येक बालकाच्या जन्म-मृत्यूची नोंद महापालिकेला डोळ्यात तेल घालून करावी लागते. २०१६ मध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंत ४९ हजार २४० बालकांनी जन्म घेतला. यामध्ये २५ हजार ७२१ मुले, तर २३ हजार ५१९ मुलींची संख्या होती. मुलींचा जन्मदर इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अत्यंत समाधानकारक आहे. जन्मापासून १ वर्षापर्यंत मरण पावलेल्या बालकांची संख्या १ हजार २९ आहे. यात मुलांची संख्या ६४६, तर मुलींची ३८३ आहे. जन्मापासून पाच वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूची संख्या १७६ आहे. जन्मत:च मरण पावलेल्या बालकांची संख्या २८९ आहे. जन्मापूर्वीच मरण पावलेल्या बालकांची संख्या फक्त ३५ असल्याचा अहवालही मनपाच्या आरोग्य विभागाने शासनाला पाठविला आहे.विविध कल्याणकारी योजनाकेंद्र व राज्य शासनामार्फत माता मृत्यू, बालक मृत्यू दर कमी व्हावा यासाठी योजना राबविण्यात येत आहेत. जन्मत:च मरण पावलेल्या मुलांचा आरोग्य विभागातर्फे स्वतंत्रपणे शोध घेण्यात येतो. यासाठी शासनाने समिती नेमलेली आहे. समिती मृत्यूच्या विविध कारणांचा शोध घेऊन शासनाला अहवाल सादर करते. महापालिका आरोग्य विभाग १०० टक्के शासन योजना राबवीत आहे. यासाठी आशा वर्कर्स आणि मनपाचे संपूर्ण कर्मचारी बाह्यरुग्ण विभागाचे काम संपल्यावर शासन योजनांवर काम करतात.-संध्या टाकळीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी२०१६ चा जन्म-मृत्यू दराचा अहवाल४९,२४०बालकांचा जन्म१,५२९बालकांचा मृत्यू९,५२९मोठ्या व्यक्तींचा मृत्यू