शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

मर्सिडीजनंतर आता एकाच वेळी २५० इलेक्ट्रिक वाहनांची डील

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 07:28 IST

औरंगाबादेत पुन्हा एकदा विक्रम : पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक प्रयत्न

अमिताभ श्रीवास्तवऔरंगाबाद : एकाच वेळी दीडशे मर्सिडीज खरेदी करण्याचा विक्रम केल्यानंतर ऐतिहासिक औरंगाबाद शहर आता एकाच वेळी २५० इलेक्ट्रिक चार चाकी वाहने घेण्याचा विक्रम करणार आहे. याबाबतच्या डीलला अंतिम रूप देण्यात आले असून, या महिन्याच्या अखेरपासून मार्चपर्यंत सर्व वाहने ग्राहकांना सुपुर्द करण्यात येणार आहेत.

उद्योग जगतातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या प्रस्तावित व राज्य सरकारकडून संचालित इलेक्ट्रिक वाहनांना सबसिडी देण्याची योजना मार्चपर्यंत वाढविल्यानंतर शहरात २५० वाहने एकाच वेळी खरेदी करण्याच्या कल्पनेने उचल खाल्ली. याबाबत वाहनांची उपलब्धता, ही एक समस्या होती. ती आता अदालत रोडवरील शहरातील एका मोठ्या वाहन डीलरने दूर केली आहे. शानदार बुकिंग पाहून महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कंपनीकडून तीन महिन्यांत वाहने उपलब्ध करण्यास तयार झाले आहे. याशिवाय गरज पडल्यास आर्थिक साह्यासाठी काही बँकांशीही चर्चा सुरू आहे. यात एका मोठ्या बँकेने कर्ज देण्यासाठी होकारही दिलेला आहे.

वेगळा व गोपनीय प्रयत्नदीडशे मर्सिडीज खरेदी केल्यानंतर औरंगाबादेत २५० इलेक्ट्रिक वाहने एकाच वेळी खरेदी करण्यासाठी वेगळे व गोपनीय प्रयत्न करण्यात येत आहेत. याचा उद्देश संपूर्ण देशाला पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणे, हा आहे. दुसऱ्या कोणत्या शहराने याची कॉपी करू नये, यासाठी ही मोठी डील गुप्त ठेवली जात आहे.रॅली काढण्याची योजनामोठ्या संख्येने इलेक्ट्रिक वाहनांचे शहरात आगमन होत असल्यामुळे सामाजिक व पर्यावरणाशी संबंधित लोकही उत्साहित झाले आहेत. एप्रिलमध्ये सर्व वाहनांना एकत्रित करून शहरात एक रॅली काढण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या आवश्यकतेबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये जागरूकता वाढणार आहे.

डीलबाबत उत्सुकता वाढलीnएकीकडे २५० इलेक्ट्रिक वाहनांच्या नव्या डीलच्या चर्चेने जोर धरला आहे तर दुसरीकडे त्याच संबंधातील प्रयत्नात उद्योगपती तसेच व्यापारी, ऑटो डिलर्सशी विचारपूस करण्याचा उपक्रम सुरू आहे. nउपलब्धता व मोहिमेच्या मर्यादेमुळे लवकर प्रयत्न न केल्यास ग्राहकांची निराशा होऊ शकते.

मागणी अधिक; परंतु उपलब्धता कमीकेंद्र व राज्य सरकारचे प्रयत्न व काही क्षेत्रांतील अनिवार्यतेमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. परंतु निर्माते ही मागणी पूर्ण करण्यास समर्थ नाहीत. अनेक कंपन्यांत सहा ते सात महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे. काही कंपन्यांनी बाजाराची मागणी लक्षात घेऊन पावले उचलली असून, त्याचे परिणामही दिसू लागले आहेत. 

 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcarकार