बीड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभाच्या विहिरी मंजूर झाल्या होत्या. मात्र, एकूण विहिरींपैकी निम्म्याहून अधिक विहिरींचे काम रखडले होते. टंचाई काळात अपूर्ण विहिरींची कामे पूर्ण करण्याचे धोरण आखले होते, त्यानुसार आतापर्यंत ३ हजार ७८४ विहिरींची कामे प्रगतीपथावर आहेत. उर्वरित विहिरींच्या कामासाठी ३० जूनची ‘डेडलाईन’ आहे.वैयिक्तक लाभाच्या १० हजार ५२५ विहिरी मंजूर होत्या. त्यापैकी केवळ ३ हजार ७३१ विहिरी पूर्ण झाल्या होत्या. उर्वरित ६ हजार ७९४ विहिरींची कामे रखडली होती. टंचाई काळात विहिरींची कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मग्रारोहयोची यंत्रणा कामाला लागली होती. ७ मार्च २०१५ पासून आतापर्यंत ३ हजार ७८४ विहिरींची कामे हाती घेतली आहेत. यापैकी निम्म्यापेक्षा अधिक विहिरींची कामे पूर्णत्वाकडे आहेत. दरम्यान, उर्वरित ३०१० विहिरींची कामे अद्याप अपूर्ण आहेत. ती पूर्ण करण्यासाठी ३० जूनपर्यंत संधी आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जि.प. सीईओ नामदेव ननावरे यांनी देखील अर्धवट कामे असलेल्या विहिरी पूर्ण करण्यासाठी तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या. त्यामुळे ५० टक्के विहिरींची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असताना त्यापेक्षा अधिक विहिरींची कामे सुरु झाली आहेत.
रखडलेल्या तीन हजार विहिरींना ३० जूनची ‘डेडलाईन’
By admin | Updated: May 25, 2015 00:28 IST