वाळूज महानगर : आठवडाभरापूर्वी जोगेश्वरीतून बेपत्ता झालेल्या एका १८ वर्षीय तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रविवारी रात्री वाळूज शिवारातील एका विहिरीत आढळल्यामुळे खळबळ उडाली. हा खून आहे की आत्महत्या; याविषयी गूढ कायम आहे.सुनीता परशुराम औचरमल (१८ रा.जोगेश्वरी ता. गंगापूर) ही भोळसर स्वभावाची होती. १२ मे रोजी सायंकाळी ती आईला मी शौचालयात जात आहे, असे म्हणून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी न परतल्यामुळे तिच्या आईने दुसऱ्या दिवशी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.विहिरीत आढळला मृतदेहरविवारी वाळूज शिवारातील आरगडे वस्तीजवळ असलेल्या देशमुख यांच्या शेतातील एका विहिरीत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह असल्याची माहिती वाळूज पोलिसांना मिळाली. वाळूज पोलिसांनी रात्री ११ वाजेच्या सुमारास नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह सुनीता औचरमल हिचा असल्याचे तपासात स्पष्ट झाले. वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास फौजदार गिते करीत आहेत.
बेपत्ता तरुणीचा मृतदेह विहिरीत
By admin | Updated: May 19, 2015 00:51 IST