शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

कष्टाची ही वाट दुधवाल्यांची पहाट

By admin | Updated: July 20, 2014 00:32 IST

सितम सोनवणे , लातूर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणारे डेअरीवाले-दुधवाले हजारो लिटर दूध लातूर शहराला उपलब्ध करून देतात़

सितम सोनवणे , लातूरजिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणारे डेअरीवाले-दुधवाले हजारो लिटर दूध लातूर शहराला उपलब्ध करून देतात़ यासाठी रात्री २ वाजेपासूनच त्यांच्या कष्टाला सुरूवात होते़ आणि पहाटे ५़३० वाजता विश्रांती मिळते़ उद्यासाठीच्या कामाचे नियोजन करूनच त्यांना गावाकडे परतावे लागते़ राजीव गांधी चौकात शनिवारी पहाटे ४ वाजताचे वातावरण पथदिव्यांच्या लख्ख प्रकाशाने उजळून निघाले होते़ त्यातच बब्रुवान पुजारी व विजया पुजारी यांनी आपले हॉटेल उघडून त्यापुढे पाणी मारून खुर्च्या, स्टूल, टेबल ठेऊन ग्राहकांच्या प्रतीक्षेत मोबाईलवर देवीची आरती सुरु केली़ ग्राहक येताच त्यांना चहा, पाणी दिले़ बघता-बघता लोकांची वर्दळ वाढू लागली़ पहाटेचा फेरफटका मारण्यासाठी आलेल्या लोकांची राजीव गांधी चौकातही गर्दी झाली़ दरम्यान, औशाकडून आलेली बस चौकातून शहरात वेगाने निघून गेली़ एखादा टेम्पो राजीव गांधी चौकाला फेरी मारून नांदेड रोडकडे भरधाव वेगाने जात असे़ पहाटेचा फेरफटका मारण्यासाठी आलेले स्त्री, पुरुष फेरफटका मारून झाल्यावर चौकात एका रांगेत उभे दिसले़ सहज उत्सुकतेपोटी त्यांना ‘तुम्ही रांगेत का उभारलात’ असे विचारले असता ‘दूध खरेदीसाठी’ आम्ही रांगेत उभे आहोत़, असे त्यांनी सांगितले़ शिरूर अनंतपाळ तालुक्यातील दैठणा येथील दुग्ध व्यवसाय करणारे सेवानिवृत्त अपर पोलिस अधीक्षक बाजीराव शिंदे यांच्या डेअरीच्या दुधासाठी या रांगा लागल्याचे ग्राहकांनी सांगितले़ पहाटे ५़३० च्या सुमारास पाकिटबंद दुधाचा एक टेम्पो येऊन थांबला़ बघता बघता टेम्पोमधील ३०० लिटर्स दूध अवघ्या १५ ते २० मिनिटात संपले़ याबरोबरच औसा, साई, पाच नंबर पाटी, आलमला येथील दूधवालेही आपले दूध विक्री करत होते़ त्यांनी ५ ते २५ लिटरपर्यंत दूध विक्रीसाठी आणले होते़ हे दूध विक्री करून परत गावाकडे जाण्यासाठी लगबग हे दूधवाले करत होते़ डेअरीचे मालक शिंदे म्हणाले वर्ष २००७ पासून हा व्यवसाय करत असून, रात्री २ वाजेपासून या कामाला सुरूवात करतो़ मी माझे कुटुंबिय व डेअरीतील आठ कर्मचारी असा ताफा म्हशीचे शेण काढण्यापासून त्यांना धुवून, चारा टाकून, धारा काढेपर्यंत पहाटेचे ४ केव्हा वाजतात हे लक्षात येत नाही़ ४़३० वाजता सर्व पाकिटबंद दूध गाडीत टाकून गाडी लातूरच्या दिशेने निघते ५़३० वाजता राजीव गांधी चौकात पोहोचतो़ पंधरा ते वीस मिनिटात ३०० लिटर दूध संपते़ हा नित्य उपक्रम ठरला आहे़ साईचे सचिन पवार सांगतात ८ म्हशीचे ४ वाजल्यापासून सर्व कामे आटोपून २५ लिटर दूध घेऊन ५ वाजता राजीव गांधी चौकात येतो़ सुनीता सुरवसे या ११ लिटर दूध विक्रीसाठी आल्या होत्या़ औशाचा गफार सय्यद हा शालेय विद्यार्थी ७ लिटर दूध घेऊन आला होता़ मागील तीन वर्षांपासून छत्रपती नगरमधील घरातून ४ वाजता बाहेर पडतो़ या दुधासाठी रांगेत थांबून दूध घेऊन जातो, असे ग्राहक एस़डी़पाटील यांनी सांगितले़दुग्ध व्यवसायात कष्ट, परिश्रम करावेच लागतात़ मुलगा बी.ई. मेकॅनिकल असूनही नोकरी न करता या व्यवसायाकडे वळला आहे, असे दूध उत्पादक बाजीराव शिंदे यांनी सांगितले़