शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण मोहिमेची तारीख लवकरच जाहीर होणार; जिल्ह्यात दोन टप्प्यांत राबविणार मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 19:13 IST

Corona vaccine जिल्ह्यात लसीकरणासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात येत असून, शासनस्तरावरून लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल.

ठळक मुद्देलसीकरण केंद्रावर नियुक्त करण्यात येणारी पथके प्रशिक्षणासह सज्जपोलीस विभाग या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होईल.

औरंगाबाद : जिल्ह्यात दोन टप्प्यांत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, मोहिमेची तारीख शासन स्तरावरून लवकरच जाहीर होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना लसीकरण जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी यंत्रणेला सूचना केल्या. जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, लसीकरणासाठी सर्वांची पूर्व नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी केलेल्यांना लसीकरणाची वेळ, ठिकाण, दिनांक याबाबतची माहिती मोबाईलवर मेसेजद्वारा देण्यात येईल. जिल्ह्यात लसीकरणासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात येत असून, शासनस्तरावरून लवकरच तारीख निश्चित करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांनी तालुका स्तरावर चोख नियोजन ठेवावे. लसीरण केंद्रांमधील सर्व आवश्यक सुविधा, स्वच्छता, पूरक बाबींची व्यवस्था यासह पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ, लसीकरण पथकांची नियुक्ती करावी. सर्व संबंधितांना पूर्व प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष लसीकरण संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. तसेच लसीकरण झाल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, अंतर ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, असे सूचित केले. मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय, जि. प. सीईओ मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, डॉ. एस. शेळके, डॉ. वाघ, डॉ. मुजीब, डॉ. नीता पाडळकर, डॉ. सुंदर कुलकर्णी, आदींची उपस्थिती होती.

केंद्रावरील पथके प्रशिक्षणासह सज्ज ठेवाजिल्ह्यात दोन टप्प्यांत कोरोना लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार असून, लसीकरण केंद्रावर नियुक्त करण्यात येणारी पथके प्रशिक्षणासह सज्ज ठेवावीत, असे जिल्हाकिाऱ्यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त म्हणाले,बैठकीत पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले, गेले वर्षभर सर्वजण युद्धपातळीवर कोरोना विषाणू विरोधात लढा देत आहोत. या लढाईतल्या महत्त्वाच्या वळणावर आपण आलेलो आहोत. यात सर्वांची भूमिका महत्त्वाची असून, पोलीस विभाग या मोहिमेत सक्रियपणे सहभागी होईल. सर्वांनी ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद