शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अर्धापूरच्या प्रकाशाला नियोजनाचा अंधार

By admin | Updated: May 28, 2014 00:41 IST

उदयकुमार गुंजकर , अर्धापूर अर्धापूर शहराला प्रकाशमय करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी आलेला असताना नियोजनाअभावी हा पण निधी इतरत्र वर्ग झाला़

 उदयकुमार गुंजकर , अर्धापूर अर्धापूर शहराला प्रकाशमय करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी आलेला असताना नियोजनाअभावी हा पण निधी इतरत्र वर्ग झाला़ त्यामुळे सर्वकाही उपलब्ध असूनही शहरवासियांना अंधारात वावरावे लागत आहे़ शहरातील प्रभागात नवीन पोल उभारणे, पथदिवे दुरूस्ती व सर्वत्र सीएफएल बल्ब बसविणे इत्यादी कामे करून अर्धापूर शहर प्रकाशमय करण्यासाठी निधी आलेला आहे़ पण नगरपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे अद्यापही या बाबतीत काहीच निर्णय झालेला नाही़ ग्रामपंचायतच्या काळात दिवाबत्तीवर चार ते पाच लाख रुपये खर्च होवून ७० टक्के शहर प्रकाशमय राहत होते़ पण आता त्या रकमेच्या दहा पट निधी आलेला असताना अद्यपि कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत़ नगर पंचायत अस्तित्वात येताच शहरातील दिवाबत्तीवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते़ त्या लाखो रुपयांची बिले निघाली पण कागदोपत्री हिशोब जुळत नसल्याने लेखा परीक्षणात ताशेरेही ओढण्यात आले़ शहरातील दिवाबत्तीवर एवढा खर्च होवूनही काही प्रभागात अद्याप अंधार आहे़ नगर पंचायतच्या नियोजन शून्यतेमुळे यापूर्वी बांधकाम विभागाकडे वर्ग केलेला निधी अद्यापही खर्च का झाला नाही म्हणून नांदेडच्या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी तत्कालीन मुख्याधिकार्‍यांना खडसावले़ त्यामुळे दरम्यानच्या काळात तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी फोनवरून सर्व नगरसेवकांची तत्काळ बैठक बोलावली होती़ त्या बैठकीत काम का झाले नाही, यावर काही तोडगा न निघता विकासनिधीवरून वादावादीचे रुपांतर नगरसेवकांच्या हाणामारीत झाले़ विकास कामांसाठी आलेला निधी नगर पंचायतने स्वत: खर्च न करता बांधकाम विभागाकडे वर्ग करून कोणाचे हित साधले, त्या वेळेस नगर पंचायतला पूर्ण वेळ मुख्याधिकारी, इंजिनिअर असतांना वेळेत काम पूर्ण होवू शकले नाही़ सत्तेचे विकेंद्रीकरण स्थानिक स्वराज्य संस्थेला जादा अधिकार देवून सक्षम करावे आणि ग्रामविकास साधला पाहिजे हे राजीव गांधींचे स्वप्न असताना नगर पंचायतला आलेला निधी इतरत्र वर्ग करून काय साध्य करीत आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे़ येणार्‍या निधीतून शहरात वसमत फाटा ते इरिगेशन कॉलनी, तसेच गावातील मुख्य रस्त्यावर बसस्टँड, बाजार चौक, दर्गाह ते तहसील कार्यालयापर्यंत पथदिवे उभारण्याची योजना अंमलात आणणार आहोत - आशुतोष चिंचाळकर, प्रभारी मुख्याधिकारी, नगर पंचायत, अर्धापूर सीएफएल बल्ब बसविण्याबाबत बैठकीत ठराव घेण्यात आला़ पण पुढे कार्यवाही शून्यच आहे - प्रकाश सरोदे, नगरसेवक़ दिवाबत्तीची योजना चांगली असून आचारसंहितेमुळे त्याला अंमलात आणण्यास उशीर होत आहे - रेखाताई काकडे, नगराध्यक्षा, नगर पंचायत, अर्धापूर आचारसंहितेचे कारण दाखवून प्रकाशासाठी घाई करून स्वत:चे हीत सांभाळत हा निधी इतरत्र वळवून नगर पंचायत शहराला अंधारात ठेवणार का? - सखाराम क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख, अर्धापूर