शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
4
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
5
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
6
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
7
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!
8
Smriti Mandhana: 'वनडे क्वीन'ची 'परफेक्ट कपल गोल' सेट करणारी लव्हस्टोरी! पलाशसोबतचा मैदानातील 'तो' व्हिडिओ व्हायरल
9
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
10
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
11
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
12
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
13
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
14
बापरे! तब्बल ८८ कोटीला एक टॉयलेट सीट विकतोय 'हा' माणूस; अखेर इतकी महाग का आहे?
15
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
16
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
17
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
18
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
19
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
20
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय

यूपीएससीत मराठवाड्याचा डंका ! ८० हून अधिक मराठी चेहऱ्यांत १५ मराठवाड्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 17:31 IST

बीड जिल्ह्यातील ६, नांदेड ३, जालना २, परभणी १, औरंगाबाद १, लातूर १, उस्मानाबाद १ जण यशस्वी

ठळक मुद्देयूपीएससी निकालात महाराष्ट्राचा टक्का वाढला उज्ज्वल यशाची परंपरा कायम 

औरंगाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत महाराष्ट्रातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले असून, यात मराठवाड्यातील १५ जणांचा समावेश आहे. नेहा भोसले हिने देशात १५ वा, बीड येथील मंदार पत्की याने २२ वा, नांदेडच्या योगेश पाटील याने ६३ वा, तर सोलापूरमधील राहुल चव्हाण याने १०९ वा क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे, सोलापूर जिल्ह्यातील आठ जणांनी यशाचा झेंडा रोवला आहे. 

देशात ८२९ उमेदवारांनी यश संपादन केले. प्रदीप सिंह याने देशात प्रथम, जतीन किशोर याने द्वितीय, तर प्रतिभा वर्मा हिने तृतीय क्रमांक पटकावला. खुल्या संवर्गातील ३०४, आर्थिक दुर्बल घटकातील ७८, इतर मागासवर्गीय संवर्गातील २५१, अनुसूचित जाती संवर्गातील १२९ आणि अनुसूचित जमाती संवर्गातील ६७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेत मराठवाड्यातील १५ जणांनी यशोशिखर गाठले आहे. यात बीड जिल्ह्यातील ६, नांदेड ३, जालना २, परभणी १, औरंगाबाद १, लातूर १, उस्मानाबाद १ जणाचा समावेश आहे, यात बीडचे मंदार पत्की यांनी राज्यात दुसरा, तर देशात २२ वा क्रमांक पटकावला आहे. ध्येय, दिशा निश्चित करून अभ्यासाचे अतिसूक्ष्म नियोजन केल्यास हमखास यश प्राप्त होते, अशा शब्दात युपीएससी परीक्षेत देशात २२ वा आणि राज्यात दुसरा आलेल्या मंदार पत्की यांनी यशाचे गमक सांगितले. 

अंबाजोगाईच्या वैभव वाघमारे यांनी या परीक्षेत ७७१ वा क्रमांक पटकावला. बीड जिल्ह्यातील श्रेणिक दिलीप लोढा हे २२१ वे आले आहेत. २०१८ मध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना १३३ वा रॅँक मिळून आयपीएस केडर मिळाले. सध्या नाशिक येथे प्रशिक्षण सुरु असून २० आॅगस्टनंतर अमरावती येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून ते रुजू होणार आहेत. ओबीसी प्रवर्गातून बीड येथील प्रसन्ना रामेश्वरसिंग लोध यांनी ५२४ वा रॅँक मिळविला. बारावीच्या सीईटी परीक्षेत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला होता.  बीड येथील जयंत किशोर मंकले यांनी दिव्यांगांतून १४३ वा रॅँक पटकावला आहे. केज तालुक्यातील आडस येथील नेहा किर्दक यांनी ३८३ वा रॅँक मिळविला. त्या एमबीबीएस झालेल्या असून सध्या कुटुंबियांसह औरंगाबादेत वास्तव्यात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील नागणीचे आकाश विनायक आगळे हे ३१३ व्या क्रमांकावर आहेत़ कंधार तालुक्यातील मौजे दिग्रस येथील माधव विठ्ठल गिते यांना २१० वी रँक मिळाली आहे़ अल्पभूधारक असलेल्या शेतकरी कुटुंबातून ते आले आहेत़ नायगाव तालुक्यातील शेळगाव (गौरी) येथील योगेश अशोक बावणे (पाटील) यांना दुसऱ्याच प्रयत्नात ६३ वा रँक मिळाला आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यातील एकुरगा येथील असित नामदेव कांबळे यांनी ६५१ वा रँक मिळविला आहे. यावर्षीच मार्च महिन्यात त्यांनी भारतीय वनसेवा परीक्षेत ६६ वा क्रमांक पटकाविला होता. त्यांचे वडील नामदेव कांबळे हे राज्य परिवहन महामंडळ उमरगा येथे मेकॅनिक म्हणून निवृत्त झाले आहेत. 

युपीएससी हा प्रशासकीय सेवेत रूजू होण्याचा राजमार्ग आहे, अशी प्रतिक्रिया ७५२ व्या रँकवर आलेल्या लातूरच्या नीलेश गायकवाड यांनी व्यक्त केली. त्यांनी आयआयटी मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक. आणि एम.टेक या पदव्या प्राप्त केल्या.औरंगाबादचे सुमीत राजेश महाजन हे २१४ वे आले आहेत. जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यातील वरूड (बु.) येथील अभिजित जिनचंद्र वायकोस यांना ५९० रँक मिळाली आहे. जाफराबाद तालुक्यातीलच बेलोरा येथील अक्षय दिनकर भोसले यांना ७०४ रँक मिळाली आहे. परभणी येथील कुणाल मोतीराम चव्हाण यांनी २११ वा रँक मिळवित यश संपादन केले आहे. ते बी. टेक. झालेले आहेत. गेल्या काही वर्षांपासून यूपीएससी निकालात महाराष्ट्राचा टक्का वाढला असून यंदाही निकालाची परंपरा कायम आहे. मंदार पत्की याने पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले. पुण्यातील दिव्यांग विद्यार्थी जयंत मंकले यादीत चमकला आहे. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगcollectorजिल्हाधिकारीMarathwadaमराठवाडा