लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात हजेरी लावलेल्या पावसामुळे येलदरी, सिद्धेश्वर, इसापूर धरण मृतसाठ्याबाहेर आले आहेत. मात्र सिंचनासाठी आणखी साठा होण्याची गरज आहे.पावसाने अधून - मधून हजेरी लावल्यामुळे निदान पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे. आतापर्यंत ५६७.९९ मिमी पावसाची नोंद झाली असून, २१ सप्टेंबर रोजी ९.६६ मिमी पाऊस झाला आहे.आजघडीला येलदरी ८०९.२६ दलघमी जिवंतसाठ्याची क्षमता असताना सध्या ८२.७७५ दलघमी म्हणजे १०.२३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच सिद्धेश्वर धरणाची ८०.९६ जिवंतसाठ्याची क्षमता असताना सद्यस्थितीत ४३.६०६ दलघमी म्हणजे ५३.८६ टक्के एवढा तर इसापूर धरणात ९६४.०९९४ दलघमी क्षमता असताना आजघडीला १०७.३२९ दलघमी म्हणजे ११.१३ एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. अजूनही पाणी येण्याची शक्यता असल्याने धरणाची पाणीपातळी वाढण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील धरणे मृत साठ्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 00:30 IST