हिंगोली : जिल्हा परिषदेच्या दलित वस्तीच्या निधीचा खर्च अजूनही सुरू झाला नाही. काही ठिकाणीच ग्रामपंचायतींनी निमूटपणे ई-निविदेची प्रक्रिया सुरू केली आहे. इतरत्र मात्र यावरून अजूनही वादंगच सुरू असल्याने कामे ठप्प पडली आहेत.मार्च एण्डपर्यंतही मंजुरीच्या प्रतीक्षेत राहणाऱ्या व कायम वादाचे कारण ठरणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचे यंदा लवकर नियोजन झाले. दुष्काळामुळे या कामांनाही पाणीटंचाईचा फटका बसू नये, ही घाई केली. मात्र ती काही उपयोगाची झाली नसल्याचे नंतरच्या काळात दिसून आले. या कामांनाही तीन लाखांच्या वरील कामाची ई-निविदा काढण्याचा नियम लागू करायचा की नाही, याचा फटका बसला. स्थायी समिती व सर्वसाधारण सभेत हा मुद्दा चर्चेत आला होता. शासनाचे मार्गदर्शन मागविले. मात्र ते येण्याचा पत्ता नसल्याने प्रस्ताव अडून पडले आहेत. त्यासाठी कुणी पुढाकार घेतला तरीही ताळमेळ लागणे अवघड आहे. मात्र तूर्ततरी काही ग्रामपंचायतींनी या भानगडीत न पडता गंभीर दुष्काळाची चाहूल लक्षात घेता ई-निविदेची प्रक्रिया सुरू केली आहे. (वार्ताहर)
दलित वस्तीचे भिजत घोंगडे कायम
By admin | Updated: January 13, 2016 23:59 IST