शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात दररोज २५० टन गहू, ४०० टन मैदा, आट्याची विक्री 

By प्रशांत तेलवाडकर | Updated: December 10, 2023 11:35 IST

शहरात सध्या मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात राज्यातून गव्हाची आवक होत आहे.

छत्रपती संभाजीनगर : भाकरी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असले तरी पोळीशिवाय जेवणात मजा नाही, असेच बहुतांश नागरिक सांगतात. त्यामुळेच शहरात दररोज २५० टन गहू तर २०० टन मैदा व २०० टन आटा, तंदूर आट्याची विक्री होते. आट्याची विक्री नुसतीच पोळ्यांसाठी नव्हे तर बेकरी उत्पादनातही मोठ्या प्रमाणात मैदा लागत आहे, त्यामुळे विक्री वाढली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, गुजराती गव्हावर मदारशहरात सध्या मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात राज्यातून गव्हाची आवक होत आहे. मध्यंतरी गव्हाला कीड लागल्याने गव्हाची गुणवत्ता खराब झाली होती. सध्या दर्जेदार गव्हाची कमतरता बाजारात जाणवत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात मागील १० महिन्यांत १ हजार रुपये वाढले असून, ३३०० ते ३७०० रुपये क्विंटल गहू विकला जात आहे.

हायब्रीडने शाळू ज्वारीची भाववाढ रोखलीशाळू ज्वारीत १० महिन्यांत तब्बल अडीच हजार रुपये भाववाढ झाली. सध्या शाळू ज्वारी ५५०० ते ६१०० रुपये क्विंटल विकत आहे. खान्देशातून हायब्रीड ज्वारीची आवक सुरू झाली असून ३८०० ते ४२०० रुपये क्विंटल विकत आहे. या हायब्रीड ज्वारीने शाळू ज्वारीची भाववाढ रोखली आहे.

थंडी जाणवताच बाजरीचा खप वाढला १२ टनांपर्यंतदीड महिन्यांपूर्वीच बाजरीची आवक सुरू झाली तेव्हा २४०० ते २७०० रुपये क्विंटलने बाजरी विकत होती. मात्र, अवकाळी पावसाने बाजरीचा रंग काळवंडला आहे. त्यामुळे चांगल्या बाजरीचा २९०० ते ३२०० रुपये क्विंटल भाव आहे. त्यात आता कर्नाटक व राजस्थानमधून बाजरी येत असून २८०० ते ३१०० रुपयांपर्यंत विकत आहे. दररोज १२ टन बाजरीचा खप शहरात होत आहे.- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी

निर्यातीने रवा, मैदा, आटाही महागलागव्हापाठोपाठ रवा, मैदा, आट्याची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली. त्यामुळे मागील १० महिन्यांत ५० किलोमागे ७० ते ८० रुपयांनी भाववाढ झाली. मैदा बेकरी उत्पादनासाठी लागतो तसेच हॉटेलवाल्यांना आटा व तंदूर आटा लागतो. सध्या मैदा व आटा मिळून दररोजचा खप ४०० टनापर्यंत आहे.- चांदमल सुराणा, होलसेल व्यापारी

दररोजची विक्री१) गहू --- २००- २५० टन २) ज्वारी-- ७- ८ टन ३)बाजरी--१०-१२ टन४) रवा-- ७५-८० टन५) मैदा- २०० टन ६) आटा- २०० टन

कशी झाली भाववाढ?प्रकार मार्च (प्रतिक्विंटल) डिसेंबर१) गहू २४०० ते २७००रु-- ३३०० ते ३७००रु२) ज्वारी ३००० ते ३२०० रु-- ५५०० ते ६१०० रु३) बाजरी २४००ते २७००रु---२९०० ते ३२०० रु (प्रति ५० किलो)४) रवा १५५५ ते १५७० रु ---१६२५ ते १६५० रु ५) मैदा १५३० ते १५५०रु ---१६०० ते १६७० रु ६) आटा १४५५ ते १४८० रु ---१५२५ ते १५६० रु ७) तंदूर आटा १५३० ते १५८०रु --१६०० ते १६६० रु

टॅग्स :Marketबाजारfoodअन्नAurangabadऔरंगाबाद