लातूर : लातुरात प्रथमच झालेल्या दहिहंडी स्पर्धेत शहरातील धाडस युवा मित्र मंडळाच्या संघाने स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकाविले.रविवारी क्रीडा संकुलाच्या मैदानावर विष्णुभैय्या खोडवेकर युवा प्रतिष्ठानच्यावतीने झालेल्या या दहिहंडी स्पर्धेत एकूण सहा संघानी सहभाग नोंदविला. यात धाडस मित्रमंडळासह हिंदू रक्षक दल, संतोष जोगी व्यायाम शाळासह इतर तीन संघांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमास अभिनेत्री निशा पुरुळेकर यांची विशेष उपस्थिती होती. ६० जणांचा चमू असलेल्या धाडस संघाने चार थरांच्या मदतीने उत्कृष्ट ताळमेळाच्या जोरावर उत्तम मनोऱ्याचे प्रदर्शन केले. या जोरावर संयोजकांनी धाडस मित्र मंडळास १ लाख ११ हजार १११ रुपयांचे रोख पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोज डोंगरे, रविंद्र जगताप, अजय जाधव, अॅड़ गोपाळ बुरबुरे, नितिन लोखंडे, यश खेकडे, राहुल मोरे, राज गायकवाड आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
दहिहंडीत ‘धाडस’ संघाची बाजी
By admin | Updated: September 6, 2015 23:57 IST