लोकमत न्यूज नेटवर्कबीड : चार महिन्यांपासून आष्टी तालुक्यात अट्टल गुन्हेगार असलेला पल्या वावरत असल्याची माहिती मिळाली, मात्र तो हाती लागत नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने रात्रभर सापळा लावत उजाडताच त्याच्या मुसक्या आवळल्या. दीपक उर्फ पल्या ईश्वर भोसले [रा. बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर] असे पकडलेल्या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.बेलगाव येथील ईश्वर गणा भोसले याला १७ ते १८ मुले आहेत. त्यांची एक गुन्हेगारी टोळीच आहे. ईश्वºयासह त्याची सोन्या, सुºया व गहिन्या या मुलांना यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. पल्या हा विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता.दरम्यान, पल्यावर दरोडा, खून, जबरी चोरी, बलात्कार, लूटमार, बनावट सोने देऊन फसवणूक करणे यासारखे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याने बीड, अहमदनगर, सोलापूर, पुणे आदी जिल्ह्यात दहशत निर्माण केली होती. या जिल्ह्यांमध्ये गुन्हेगार असलेल्या भोसले कुटुंबियांनी विविध गुन्हे केले होते.११ आॅगस्ट २०१७ रोजी ईश्वर गणा भोसले याला स्थानिक गुन्हा शाखेने ताब्यात घेतले होते. यावेळी इतर साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले होते. पळून गेलेल्या साथीदारांचा स्थानिक गुन्हे शाखेकडून शोध सुरु होता. हळूहळू यातील तिघांना पकडले, तर पल्याच्या मागावर मागील चार महिन्यांपासून गुन्हे शाखेचे अधिकारी कर्मचारी मागावर होते. पल्या हा जास्त करुन बेलगाव वस्तीवर येत नव्हता. मात्र, गुरुवारी तो वस्तीवर झोपण्यासाठ आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी फौजफाट्यासह बेलगावकडे धाव घेतली. येथे रात्रभर सापळा लावून त्याला पहाटेच बेड्या ठोकण्यात आल्या.तीन वर्षांपासून फरारपल्या हा विविध गुन्हे करुन पोलिसांना गुंगारा देत होता. मागील तीन वर्षांपासून तो फरार होता. त्याच्या मागावर पोलीस होते. अखेर गुरुवारी पहाटे त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
रात्रभर वॉच; उजाडताच पल्याच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:48 IST