शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रविवारी रंगणार सायक्लोथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 00:43 IST

पर्यावरणाचा आणि फिटनेसचा संदेश देणारी सायक्लोथॉन २0 जानेवारी रोजी होणार आहे. इंडियन आॅईलतर्फे याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंडियन आॅईलच्या औरंगाबाद विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर एस. एम. तुमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. या सायक्लोथॉनला विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे.

औरंगाबाद : पर्यावरणाचा आणि फिटनेसचा संदेश देणारी सायक्लोथॉन २0 जानेवारी रोजी होणार आहे. इंडियन आॅईलतर्फे याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती इंडियन आॅईलच्या औरंगाबाद विभागाचे डेप्युटी जनरल मॅनेजर एस. एम. तुमाने यांनी पत्रकार परिषदेत दिली.या सायक्लोथॉनला विभागीय क्रीडा संकुल येथून सकाळी ७ वाजता सुरुवात होणार आहे. याचा मार्ग शाहनूरमियाँ दर्गा रोडमार्गे, सिग्मा हॉस्पिटल, वीर सावरकर चौक, चेतक घोडा, रामायणा कल्चरल हॉल, जवाहरनगर पोलीस स्टेशन चौक, सूतगिरणी चौकामार्गे पुन्हा विभागीय क्रीडा संकुल असा आहे. यात सहभागी होणाऱ्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे.या उपक्रमांतर्गत पेट्रोल, डिझेलची बचत करणे, तसेच पर्यावरण व फिटनेसविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. पेट्रोलियम पदार्थांची बचत करणे ही सर्व नागरिकांची जबाबदारी आहे. प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस मोटारसायकल व कारचा वापर टाळल्यास मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलची बचत होऊ शकते. नेमक्या याच गोष्टीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘सायक्लोथॉन’चे आयोजन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे देशातील २०० शहरांत एकाच दिवशी पेट्रोलियम पदार्थांसंदर्भात जनजागृतीस्तव हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये विविध शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवक-युवती, महिला-पुरुषांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सायकल चालवून स्वत:ला तंदुरुस्त तर ठेवता येतेच, शिवाय पर्यावरणाची हानीदेखील टाळता येऊ शकते, असे तुमाने यांनी सांगितले.स्वच्छ व पर्यावरणाच्या संरक्षणाचा विचार करता एक दिवस पेट्रोल-डिझेलच्या वाहनांचा वापर टाळल्यास देशाच्या प्रगतीत आपले अमूल्य असे योगदान दिले जाऊ शकते, असा संदेश पंतप्रधानांनी दिलेला आहे. सायकलिंगच्या प्रचारासाठी ‘सायक्लोथॉन’ हा अतिशय उपयुक्त असा उपक्रम ठरणार आहे. या उपक्रमात सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन इंडियन आॅईल व पेट्रोलियम कंझर्व्हेशन अँड रिसर्च असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी सत्यम वर्मा व प्रकाश एन. व राहुल दास यांचीही उपस्थिती होती.