शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सायबर भामट्यांनी व्यवस्थापकाचा ईमेल आयडी हॅक करुन साडेपाच लाख पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 20:06 IST

Cyber crime वाळूज उद्योगनगरीतील वर्षा फोर्जिंगची फसवणूक

ठळक मुद्देउद्योगनगरीतील वर्षा फोर्जिंग या कंपनीत स्टीलचे उत्पादन करण्यात येते. मटेरियल्स पुरविणाऱ्या कंपनीला पैसे मिळाले नसल्याने फसवणूक उघडकीस

वाळूज महानगर : वाळूज उद्योगनगरीतील वर्षा फोर्जिंग कंपनीच्या व्यवस्थापकाचा ईमेल आयडी हॅक करुन बनावट ईमेल आयडीद्वारे साडे पाच लाखाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी अनोळखी भामट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

उद्योगनगरीतील वर्षा फोर्जिंग या कंपनीत स्टीलचे उत्पादन करण्यात येते. तीन महिन्यापूर्वी कंपनीला लागणाऱ्या मटेरियल्सची आयात करण्यासाठी कंपनीकडून हैद्राबादच्या केएसटी इस्पात या कंपनीला ऑर्डर देण्यात आली होती. मात्र आगाऊ रक्कम मिळाल्याशिवाय हैद्राबादची कंपनी मटेरियल्स पाठवित नसल्याने वर्षा फोर्जिंग कंपनीत खरेदी विभागात काम करणारे व्यवस्थापक फजल खान यांनी मटेरियल पुरविणाऱ्या कंपनीचे बँक डिटेल्स घेऊन ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठविण्याचा निर्णय घेतला होता. मटेरियल्स खरेदी संदर्भात वर्षा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खातरजमा केल्यानंतर मटेरियल्स खरेदीस मंजुरी दिली होती. यानंतर व्यवस्थापक फजल यांनी २२ ऑक्टोबरला मटेरियल्स पुरवठा करणाऱ्या हैद्राबाद येथील कंपनीच्या बँक खात्यावर १२ लाख ४७ हजार ८५० रुपये जमा केल्यानंतर वर्षा फोर्जिंग कंपनीच्या खात्यावरुन मटेरियल्सची रक्कम कपात झाली होती. दरम्यान, व्यवस्थापक फजल खान यांनी मटेरियल्स पुरविणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगितले.

ईमेल आयडी हॅक करून फसवणूक वर्षा फोर्जिंग कंपनीच्या वरिष्ठांनी केलेल्या चौकशीत फजल खान यांचे ईमेल आयडी भामट्याने हॅक करुन बनावट ईमेल आयडी तयार करुन परस्पर पैसे लांबविल्याचे समोर आले. कंपनीच्या खात्यातून कपात झालेले १२ लाख ४७ हजार ८५० रुपये हे लखनऊ येथील अलाहाबाद बँकेचे खातेदार राजेश्वरसिंग याच्या बँक खात्यावर जमा झाल्याचे चौकशीत समोर आले. कंपनीने तक्रार केल्यानंतर राजेश्वरसिंग यांचे बँक खाते गोठविण्यात आले. मात्र तोपर्यंत राजेश्वरसिंग याने जवळपास साडेपाच लाख रुपये विविध खात्यावर ट्रान्सफर करुन काही रक्कम दिल्लीत एटीएमद्वारे काढून घेतली. कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक ऋषिकेश हमदापूरकर यांच्या तक्रारीवरुन अनोळखी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत हे तपास करीत आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमAurangabadऔरंगाबाद