शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहक त्रस्त; लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 18:33 IST

महावितरण सरासरी वीज बिल बंद करणार का ?

ठळक मुद्देघरे बंद असल्यानंतर त्यांना सरासरी बिले दिले जाते.ही ग्राहकांचे मीटर हे फॉल्टी आहे. ही मिटर बदलेपर्यंत सरासरी बिले दिले जात

औरंगाबाद : महावितरणला लॉकडाऊनच्या कालावधीत वीजग्राहकांकडील मीटर रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिले देण्यात आली. परंतु लॉकडाऊननंतरही नागरिकांना सरासरी वीजबिलांचा शॉक दिला जात आहे. त्यामुळे शहरात महावितरण सरासरी

वीजबिल देणे बंद करणार का, असा सवाल वीज ग्राहकांकडून केला जात आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. या लॉकडाऊनमुळे  महावितरणकडून वीजग्राहकांकडे जाऊन मीटरचे रीडिंग घेणे बंद होते. या कालावधीत वीज ग्राहकांना सरासरी वीजबिल देण्यात आले. ही बिले पाहून नागरिकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. या तक्रारींचे निवारण करता करता महावितरणची मोठी दमछाक झाली. अनेक ग्राहकांचा लॉकडाऊनमधील वीज बिलांचा  प्रश्न अजून सुटलेला नसताना अद्यापही सरासरी बिले येणे  सुरूच आहे. आधीच कोरोनामुळे आर्थिक उत्पन्नावर परिणाम झालेला आहे. त्यात भरमसाठ वीज बिले पाहून नागरिकांकडून महावितरणच्या कारभाराविषयी संताप व्यक्त होत आहे. 

सरासरी बिलांचे प्रमाण अत्यल्प बंद घरात मिटर असणे अथवा फाल्टी मिटर असणे, यामुळेच ग्राहकांना सरासरी बिल दिले जाते. मात्र, सरासरी वीजबिल देण्याचे प्रमाण कमी आहे. बहुतांश ग्राहकांना रिडिंगनुसारच बिल दिले जाते. घर बंद नसेल आणि फॉल्टी मिटर नसल्यास सरासरी बिल देणे बंदच होईल. योग्य बिल न आल्यास ग्राहक तक्रार करू शकतात. त्याचे तात्काळ निवारण केले जाते.- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता, महावितरण

महावितरण सांगते ही कारणे...महावितरणने ग्राहकांचे वीज मिटर घराबाहेर बसवली आहेत. परंतु अद्यापही काही मिटर घरांत आहेत आणि घरे बंद असल्यानंतर त्यांना सरासरी बिले दिले जाते. तर काही ग्राहकांचे मीटर हे फॉल्टी आहे. ही मिटर बदलेपर्यंत सरासरी बिले दिले जात असल्याचे कारण महावितरण पुढे करत आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरण