शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
2
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
3
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
5
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
6
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
9
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
10
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
11
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
13
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
14
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
15
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
16
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
17
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
18
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
19
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

सीएसएमआरडीए दलालांच्या विळख्यात? एजंट संचिका दाखल करणाऱ्याशी करतात संपर्क

By विकास राऊत | Updated: December 5, 2023 15:10 IST

मोठ्या ले-आउट मंजुरीच्या संचिका असल्यास काही दलाल संबंधितांना संपर्क करून मागणी करीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : सीएसएमआरडीए (छत्रपती संभाजीनगर मेट्रोपॉलिटियन रिजनल डेव्हलपमेंट ॲथॉरिटी) मध्ये बांधकाम परवानगी व एनएच्या अनुषंगाने दाखल झालेल्या संचिका मंजुरीसाठी एकरी ३० हजार रुपये दर आकारण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संचिका दलालांच्या विळख्यात अडकत असून, यासाठी संबंधित एजंट संचिका दाखल करणाऱ्यांशी संपर्क करीत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. ही रक्कम कोण जमा करीत आहे आणि दलालांना अभय कुणाचे आहे यावरून उलटसुलट चर्चा सुरू आहे.

मोठ्या ले-आउट मंजुरीच्या संचिका असल्यास काही दलाल संबंधितांना संपर्क करून मागणी करीत आहेत. हा सगळा प्रकार अद्याप विभागीय आयुक्त तथा प्राधिकरणाचे प्रभारी आयुक्त मधुकरराजे आर्दड यांच्या कानावर गेलेला नसावा, त्यामुळे दलालांना अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, प्राधिकरणाकडे मंजुरीसाठी संचिका दाखल केल्यानंतर ती ३० दिवसांत मंजूर झाली नाही, तर डीम्ड (अभिमत) परवानगी म्हणून संबंधित जमीनमालकाला पर्याय असताे; परंतु बीपीएमएसमध्ये संचिका ऑनलाइन अपलोड करताना त्या पर्यायाचा वापर करणे गरजेचे असते.

प्रादेशिक विकास महानगर प्राधिकरणांअंतर्गत ३१३ पैकी अनेक गावांमध्ये देण्यात येणाऱ्या अकृषक (एनए) व बांधकाम परवानग्यांमध्ये यूडीपीसीआरचे (एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावली) पालन होत नसल्याच्या त्या तक्रारी तत्कालीन आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. २०१९ च्या जुलै महिन्यातील प्राधिकरणाच्या बैठकीत कार्यकारी समितीचे काही अधिकार आयुक्तांना दिल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील ३१३ गावांतील अकृषकचे, भोगवटा, बांधकाम परवानगीचे अधिकार प्राधिकरणाकडे आले. प्रभारी आयुक्त म्हणून सध्या विभागीय आयुक्त आर्दड यांच्याकडे पदभार आहे.

कंपाउंडिंग शुल्काचे त्रांगडे...प्राधिकरणाच्या हद्दीत झालेली बांधकामे नियमित करण्यासाठी कंपाउंडिंग शुल्काचे धोरण सहा महिन्यांपासून ठरत नाही. शासनही याबाबत निर्णय घेण्यास तयार नाही. परिणामी बेलगाम बांधकामांचा सपाटा प्राधिकरणाच्या हद्दीत सुरू आहे. याकडे गांभीर्याने कुणीही पाहण्यास तयार नाही.

आयुक्त काय म्हणाले,विभागीय आयुक्त आर्दड यांना याप्रकरणी विचारले असता ते म्हणाले, याबाबत माझ्याकडे कुठलीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास निश्चितपणे कारवाई केली जाईल. किंवा काही संचिकांमध्ये त्रुटी असतील व त्या मंजूर होत नसतील, म्हणूनदेखील अशी चुकीची माहिती पेरली जाऊ शकते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDivisional Commissioner Office Aurangabadऔरंगाबाद विभागीय आयुक्तालय